शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

धक्कादायक! प्रेयसीच्या दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2023 9:52 PM

Nagpur News पतीपासून विभक्त झालेल्या महिलेचे फेसबुकवरून एका युवकाशी सूत जुळले. परंतु, या नराधमाची वाईट नजर प्रेयसीच्या दहा वर्षांच्या मुलीवर गेली. प्रेयसी घरी नसताना त्याने या मुलीवर बलात्कार केला.

नागपूर : पतीपासून विभक्त झालेल्या महिलेचे फेसबुकवरून एका युवकाशी सूत जुळले. परंतु, या नराधमाची वाईट नजर प्रेयसीच्या दहा वर्षांच्या मुलीवर गेली. प्रेयसी घरी नसताना त्याने या मुलीवर बलात्कार केला. पोटात दुखत असल्याची तक्रार मुलीने केल्यानंतर हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

धीरज ताडे असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हा बांधकाम मिस्त्री आहे. त्याची २०२० मध्ये एका ३० वर्षाच्या महिलेशी फेसबुकवरून ओळख झाली. दोघांचा संपर्क वाढला आणि त्यांच्यात सूत जुळले. दरम्यान, ही महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली. महिलेला १० आणि आठ वर्षांच्या दोन मुली आहेत. धीरजसोबत प्रेमसंबंध वाढल्यानंतर त्यांच्या भेटी वाढल्या. अविवाहित असल्यामुळे धीरजने या महिलेस लग्नाचे आमिष दाखविले तसेच तिच्या दोन्ही मुलींना सांभाळण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे महिलेने माहेर सोडले आणि ती धीरजसोबत राहू लागली.

काही दिवस धीरजने प्रेयसी आणि मुलींना चांगली वागणूक दिली. परंतु, नंतर तो दारूच्या आहारी गेला. तो दारू पिऊन महिलेच्या १० वर्षांच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहायला लागला. तो प्रेयसीला घेऊन मुंबईला कामासाठी गेला. वर्षभर तेथे काम केल्यानंतर तो परत आला. काही दिवसांपासून रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर तो महिलेच्या १० वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करू लागला होता. कुणालाही काही सांगितल्यास घराबाहेर काढण्याची धमकी त्याने या मुलीला दिली. त्यामुळे ही मुलगी त्याचे अत्याचार सहन करीत होती.

शुक्रवारी या मुलीची आई कामासाठी बाहेर गेली होती. घरी दोन बहिणी आणि आरोपी धीरज होता. दुपारच्या वेळी नराधम धीरजने १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करून शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. मुलीने त्याला विरोध केला, परंतु त्याच्या समोर तिचे काही चालले नाही आणि त्याने या मुलीवर बलात्कार करून तिचा धमकी दिली. सायंकाळी आई घरी परतल्यावर मुलीने आईला पोटात दुखत असल्याची तक्रार केली. महिलेने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने धीरजने आपल्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. हे ऐकून महिलेच्या पायाखालची वाळू सरकली. तिने मुलीला घेऊन थेट सदर पोलिस ठाणे गाठून त्याच्या विरुद्ध तक्रार दिली. सदर पोलिसांनी आरोपी धीरजविरुद्ध विविध कलमांतर्गत तसेच पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

 

...............

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी