लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे, याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१७ पासून २१ महिन्यांत रेल्वेच्या हद्दीत सव्वासातशे लोकांचा प्राण गेला. रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर शंभरहून अधिक जणांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने दोनशेहून अधिक जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत लोहमार्ग पोलिसांकडे विचारणा केली होती. जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत रेल्वे रुळ ओलांडताना, रेल्वेतून पडून, शॉक लागून, खांबाला धडकून, नैसर्गिकपणे किती जणांचा मृत्यू झाला, किती जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. लोहमार्ग नागपूरअंतर्गत येणाऱ्या गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला या पोलीस ठाण्यांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत विविध कारणांमुळे त्यांच्या हद्दीत ७२५ जणांचा मृत्यू झाला. यात ९२ महिलांचा समावेश होता. रेल्वे रुळ ओलांडताना ११२ प्रवाशांचे मृत्यू झाले तर रेल्वेतून पडल्यामुळे २०३ जणांचा बळी गेला. एकट्या नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३३ जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला.याशिवाय या कालावधीत खांबाला धडकल्याने ८, विजेचा धक्का लागून ४ तर नैसर्गिक कारणांमुळे ३४२ लोकांचा मृत्यू झाला. ३७ लोकांनी रेल्वेखाली येऊन आपला जीव दिला.नागपुरात सर्वात जास्त मृत्यूएकूण सहा लोहमार्ग पोलीस ठाण्यांपैकी नागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ महिन्यांच्या कालावधीत सर्वात जास्त मृत्यू झाले. येथे २१९ मृत्यूंची नोंद झाली तर वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५४ जणांचे मृत्यू झाले. इतवारीत ५७ मृत्यूंची नोंद झाली.
धक्कादायक : नागपूर विभागात २१ महिन्यांत रेल्वे हद्दीत सव्वासातशे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 9:16 PM
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे, याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१७ पासून २१ महिन्यांत रेल्वेच्या हद्दीत सव्वासातशे लोकांचा प्राण गेला. रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर शंभरहून अधिक जणांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने दोनशेहून अधिक जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
ठळक मुद्देरेल्वे रुळ ओलांडताना शंभराहून अधिक मृत्यू : रेल्वेतून पडल्यामुळे दोनशेहून अधिक प्रवाशांनी गमावला प्राण