शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

धक्कादायक! नागपूर जिल्ह्यात पवनी येथील तहसीलदारांच्या वाहनाला रेतीमाफियाकडून धडक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:13 AM

'लॉकडाऊन' मध्ये सुरू असलेल्या अवैध रेतीच्या वाहतूकीसंदर्भात, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाईकरिता सज्ज असलेली पवनी (जि.भंडारा) महसूल मंडळाची टीम रेतीमाफियाच्या जीवघेण्या कारनाम्यातून आज (दि.१२) थोडक्यात बचावली.

ठळक मुद्देतलाठ्याला टिप्परमध्ये बसवून काढला पळमरूनदी पुलावर तलाठ्याला मारहाणीचा प्रयत्नभिवापूर परिसरात पहाटेची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: 'लॉकडाऊन' मध्ये सुरू असलेल्या अवैध रेतीच्या वाहतूकीसंदर्भात, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाईकरिता सज्ज असलेली पवनी (जि.भंडारा) महसूल मंडळाची टीम रेतीमाफियाच्या जीवघेण्या कारनाम्यातून आज (दि.१२) थोडक्यात बचावली. तहसीलदारांच्या वाहनाला धडक देण्याची व तलाठ्याला मारहाणीचा प्रयत्न करत टिप्पर व रेतीमाफियाने पळ काढल्याची ही घटना आज (दि.१२) पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली.घटना अशी की, भंडारा जिल्ह्यातील पवनी लगतच्या गुडेगाव रेतीघाटावरून आठ टिप्पर अवैध रेतीची छुप्या मार्गाने वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पवनीचे तहसीलदार गजानन कोकोडे यांना मिळाली होती. त्याआधारावर पहाटे चार वाजताच्या सुमारास तहसीलदार कोकोडे, मंडळ अधिकारी दिलीप कावठे, तलाठी रणजीत सव्वालाखे, तातोबा पाटील ही महसूल मंडळाची टीम एम.एच. ३२ ए.एच. ७३०८ या वाहनाने कारवाई करीता लगतच्या निलज फाटा (जि.भंडारा) परिसरात पोहचली. दरम्यान अवैध रेती भरलेले दोन टिप्पर भुयारमार्गे येतांना दिसताच, कारवाईकरिता सज्ज असलेल्या पथकाने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पुढे काही अंतरावरील संजीवनी ढाबा परिसरात हे दोन्ही टिप्पर थांबले. त्यांच्या मागोमाग स्कॉर्पिओ क्र. एम.एच.४० ८६७५ मधून येणारा टिप्पर मालक कलाम खान रा. नागपूर हा सुध्दा तेथे आला. दरम्यान तहसीलदार कोकोडे यांनी टिप्पर क्र. एम.एच. ४० बी.एल. ८६७४ च्या चालकास टिप्पर तहसील कार्यालय पवनी येथे नेण्याचे बजावले. यावेळी कार्यवाहीकरीता तलाठी रणजीत सव्वालाखे सदर टिप्पर मध्ये चढताच, चालकाने टिप्परसह पळ काढला. पुढे भिवापूर परिसरातील मरूनदी वळणावर टिप्पर थांबवून चालकाने तलाठी सव्वालाखे यांना खाली उतरविले. शिवाय हातात दगड घेऊन मारहाणीचा प्रयत्न केला. 'आॅखो देखा' या प्रकाराने घाबरलेले तहसीलदार व त्यांची टिम लागलीच तलाठी सव्वालाखे यांच्या बचावाकरिता पाठलाग करीत मरूनदी पुलावर पोहचली. दरम्यान टिप्पर चालकाने तहसीलदारांच्या वाहनाला धडक देत, घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र अंगाला थरकाप उडविणा-या या घटनेने महसूल प्रशासन भयभीत झाले आहे.माहिती मिळताच, भिवापूर पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. वृत्त लिहेस्तोवर तहीलदारांकडून तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. मात्र घटना नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या अगदी? सीमेवर झाल्यामुळे घटनेची नोंद नेमकी कोणत्या हद्दीत करायची यावरून संभ्रम कायम होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी