लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करून दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१८ पासून १५ महिन्यात नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणांमुळे ५९१ जणांचा प्राण गेला. यात रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर ७६ लोकांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने १४६ जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे विचारणा केली होती. जानेवारी २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत रेल्वे रुळ ओलांडताना, रेल्वेतून पडून, शॉक लागून, खांबाला धडकून, नैसर्गिकपणे किती जणांचा मृत्यू झाला, किती जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. लोहमार्ग नागपूर अंतर्गत येणाऱ्या गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला या पोलीस ठाण्यांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत विविध कारणांमुळे त्यांच्या हद्दीत ५९१ जणांचा मृत्यू झाला. यात खांबाला धडकल्याने ३, विजेचा धक्का लागून ९४ तर नैसर्गिक कारणांमुळे २२१ लोकांचा मृत्यू झाला. प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडल्याने २८ जणांचा जीव गेला तर २३ जणांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.२०१७ च्या तुलनेत मृत्यूची सरासरी वाढली२०१७ साली नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणांमुळे ४०३ जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वेतून पडून १०२ जणांचा जीव गेला होता तर १९ जणांनी आत्महत्या केली होती. रेल्वे रुळ ओलांडणे ६० जणांच्या जीवावर बेतले होते. दर महिन्याला सरासरी ३३ जणांचा जीव गेला होता. २०१८ ते मार्च २०१९ मध्ये मृत्यूची दर महिना सरासरी ही ३९ इतकी होती.मृत्यू २०१७ २०१८-२०१९ (मार्चपर्यंत)रुळ ओलांडताना ६० ७६रेल्वेतून पडून १०२ १४६खांबाला धडक ४ ३प्लॅटफॉर्म गॅप ४ २८विजेचा धक्का २ ९४आत्महत्या १९ २३नैसर्गिक २०४ २२१इतर ८ -एकूण ४०३ ५९१
धक्कादायक ! १५ महिन्यात रेल्वे हद्दीत ५९१ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 9:20 PM
रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करून दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१८ पासून १५ महिन्यात नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणांमुळे ५९१ जणांचा प्राण गेला. यात रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर ७६ लोकांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने १४६ जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
ठळक मुद्देरेल्वे रुळ ओलांडताना ७६जणांचा मृत्यूरेल्वेतून पडल्यामुळे १२५ हून अधिक प्रवाशांनी गमावला प्राण