शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

धक्कादायक! नागपुरात यूपीएससीची प्रश्नपत्रिका फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 1:32 PM

नागपुरात केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आलेल्या अमरावती जिल्ह्यातील एका तरुणीने मोबाईलवरून तिच्या मित्राला केंद्राबाहेर प्रश्नपत्रिका पाठवली.

ठळक मुद्देमित्राला मोबाईलवरून पाठवली प्रश्नपत्रिकाअमरावतीच्या तरुणीची बनवाबनवी उघड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाची(यूपीएससी) परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आलेल्या अमरावती जिल्ह्यातील एका तरुणीने मोबाईलवरून तिच्या मित्राला केंद्राबाहेर प्रश्नपत्रिका पाठवली. परिक्षा केंद्रात मोबाईल नेण्यासाठी तिने पाण्याच्या बाटलीचा उपयोग केला होता. मात्र, तिची बनवाबनवी अखेर उघड झाली अन केंद्र प्रमुखाने तिला रंगेहात पकडले. रेशीमबागमधील जामदार हायस्कूलच्या परिक्षा केंद्रावर रविवारी दुपारी घडलेल्या या बनवानबवीच्या प्रकाराने काही वेळेसाठी संबंधितात खळबळ उडवून दिली होती.अश्विनी जनार्दन सरोदे (वय २३) असे यूपीएससीचा पेपर लिक करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ती अमरावती जिल्ह्यातील अंजनवती (ता. धामणगाव रेल्वे) येथील रहिवासी आहे. तर, शुभम भास्करराव मुंदाने (वय २५) असे तिच्या साथीदाराचे नाव असून, तो कोहळे लेआऊट, खडगाव मार्ग वाडी येथील रहिवासी आहे.रविवारी यूपीएससीचा पेपर होता. नागपुरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेशिमबागेतील जामदार हायस्कूलमध्ये त्याचे परिक्षा केंद्र होते. अश्विनी ही परिक्षा देण्यासाठी केंद्रात गेली. केंद्रात परिक्षार्थ्यांना मोबाईल नेण्यास बंदी असल्याचे पाहून अश्विनीने पाण्याच्या बाटलीत मोबाईल लपवून नेला. दुपारी १२ च्या सुमारास तिने आपला मोबाईल सुरू करून प्रश्नपत्रिकेची फोटो कॉपी काढली. तिने ही कॉपी केंद्राबाहेर असलेला तिचा साथीदार शुभम भास्करराव मुंदाने (वय २५, रा. कोहळे लेआऊट, खडगाव मार्ग वाडी) याच्या मोबाईलवर पाठवली. परिक्षा केंद्रावरच्या कॅमे-यातून अश्विनीचे संशयास्पद वर्तन टिपले गेले. त्यामुळे केंद्र प्रमुखाने तिची महिला कर्मचाºयाच्या मदतीने झडती घेतली असता तिच्याजवळ मोबाईल आढळला. तिने मोबाईल हाताळून मित्राला प्रश्नपत्रिका पाठवली अन तिचा मित्र शुभमने तिला प्रश्नांची उत्तरे पाठवल्याचेही प्राथमिक चौकशीत उघड झाले. या प्रकारामुळे संबंधितांमध्ये काही वेळेसाठी प्रचंड खळबळ निर्माण झाली. या संबंधाने वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर विनय दत्तात्रय निमगावकर (वय ५१, रा. समर्थ नगरी, सोनेगाव) यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी अश्विनी तसेच शुभम विरुद्ध फसवणुकीचे कलम ४२०, ४१७, ३४ तसेच सहकलम ४३, ६६ आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. शुभमला अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग