छतातून पाण्याची गळती : प्रसंगी आगीचा धोकानागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतील भागातील व्हीआयपी परिसरात छतातून पावसाचे पाणी गळत असल्यामुळे विमानतळावर शॉर्ट सर्किटचा धोका, शिवाय प्रसंगी आग लागण्याची भीती विमानतळावरील निकृष्ट बांधकामाची पोलखोल करताना एका हवाई प्रवाशाने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. विमानतळावरील निकृष्ट बांधकामाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी कथन केला. छताखाली प्लास्टिकच्या बादल्यामंगळवारी रात्री विमानतळाच्या आतील भागात छतावरून पाणी गळत असल्याचे छायाचित्र या प्रवाशाने लोकमतला पाठविले. छायाचित्रात छतावरून गळणारे पाणी जमा करण्यासाठी हॉलमध्ये प्लास्टिकची निळी आणि हिरवी बादली दिसत आहे.याच बादल्यांमध्ये गळणारे पाणी जमा करण्यात येत होते. त्यावेळी हॉलमध्ये १५ ते २० बादल्या होत्या. त्यातून प्रवाशांना मार्ग काढत बाहेर पडावे लागल्याची माहिती प्रवाशाने दिली. एवढेच नव्हे तर मंगळवारी रात्रीपेक्षा गुरुवारी सकाळी जास्त पावसाची नोंद आहे. त्यावेळीही छतातून गळणारे पाणी जमा करण्यासाठी प्रशासनाला बरीच कसरत करावी लागल्याची माहिती आहे. अद्ययावत सुविधांमुळे विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. प्रत्यक्ष अनुभव घेतला असता दर्जाबाबत शंका निर्माण करणारी स्थिती आहे. पाणी गळणाऱ्या छतावर विजेचे वायरिंग आहे. काही ठिकाणी भगदाड पडले आहे. कुंड्या घाणींनी भरल्या आहेत. विमानतळ परिसरात घाण पसरली होती. एवढेच नव्हे तर विमानतळासमोर खुल्या जागेतील लॉनमध्ये गवत वाढले आहे. विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने विमानतळावर स्वच्छता ठेवावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
विमानतळाला शॉर्ट सर्किटचा धोका
By admin | Published: August 14, 2015 3:19 AM