शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत मी मैदानात असतो आणि समीकरण जुळली असती तर...; जरांगेंचा नव्या सरकारला इशारा
2
सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान
3
थंडी पळाली, राज्यात २-३ दिवस पावसाची शक्यता; काही जिल्ह्यांना यलो अलर्ट...
4
एक महिन्याच्या कालावधीतच गूड न्यूज कळेल; निलेश लंकेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
5
मुसळधार पावसामुळे भूस्खलन! एकाच कुटुंबातील सात जण चिखलाच्या ढिगाऱ्याखाली दबले
6
आराध्या बच्चनचा १३ वा वाढदिवस, दोन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दिसले अभिषेक-ऐश्वर्या
7
Stock Market Updates: शेअर बाजाराच्या आठवड्याची सुरुवात रेड झोनमध्ये; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
बायडेननी जाता जाता शब्द मोडला; चेन स्मोकर मुलाला गंभीर गुन्ह्यांतून दोषमुक्त केले
9
"मला विचारा, एक एक डायलॉग...", कपिल शर्माने KBC चा उल्लेख करताच रेखाची प्रतिक्रिया
10
ओला स्कूटरची विक्री ३० टक्क्यांनी घसरली; TVS iCube च्या जवळ येऊन ठेपली
11
कोट्यवधी लोकांची ओळख असलेलं आधार कसं अस्तित्वात आलं, जनक कोण? सांगितली त्यामागची कहाणी
12
"भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मीनारही तोडणार आहेत का?"; खरगेंचा भाजपला सवाल
13
बेपत्ता युवक, एक कहाणी अन् २ कुटुंब अन् सगळाच गोंधळ; सत्य कळताच पोलिसही हैराण
14
तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय; लवकरच राज्याच्या हिताचा निर्णय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
15
राशीभविष्य - २ डिसेंबर २०२४: आजचा दिवस भाग्यवर्धक, व्यापार-व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल
16
समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर तीन अपत्ये हवीत :डॉ. मोहन भागवत
17
Shocking! 12th Fail फेम अभिनेता विक्रांत मेस्सीने केली बॉलिवूडमधून निवृत्तीची घोषणा, म्हणाला- शेवटच्या...
18
सरकारचे मागील सूत्रच कायम ठेवा; खातेवाटपावर शिंदेसेनेची मागणी
19
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर ७ नक्षल्यांचा खात्मा; एके-४७ रायफलींसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा व शस्त्रसाठा जप्त
20
आंध्रात वक्फ मंडळ बरखास्त; मंडळावर नव्याने सदस्यांची नियुक्ती करणार

बंटी शेळकेंच्या आरोपांवर काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 6:31 PM

Nagpur : नाना पटोले 'आरएसएसचे एजंट’ असल्याचा केला आरोप

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचेनागपूर मध्य मतदारसंघातील उमेदवार बंटी शेळके यांनी नाना पटोले हे ‘आरएसएसचे एजंट’ असल्याचा आरोप केला होता. त्यावर काँग्रेस पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे हे आरएसएससाठी काम करतात आणि त्यांनी निवडणुकीत मदत केली नसल्याचे आरोप केले आहेत. शेळकेंच्या म्हणण्यानुसार काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडणूक लढले पण प्रचारात एकही पदाधिकारी त्यांच्यासोबत नव्हता. प्रियांका गांधी रोड शोसाठी नागपुरात आल्या असतानाही पक्षातील कोणीही आले नव्हते. नाना पटोले आरएसएससाठी काम करतात या आरोपांवर बंटी शेळके ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. 

बंटी शेळकेंच्या या आरोपांवर काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून व नाना पटोले यांच्या सुचनेवरून बंटी शेळकेंचे हे कृत्य पक्षशिस्तीचा भंग करणारे असल्याने त्यांना काँग्रेस पक्षातून निलंबीत का करण्यात येऊ नये याबाबत शेळकेंनी लेखी खुलासा दोन दिवसांत प्रदेश कार्यालयात सादर करण्याचे सांगितले. उपरोक्त कालावधीमध्ये शेळकेंनी खुलासा न दिल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे. 

महाविकास आघाडीच्या पराभवानंतर पक्षांमधल्या फुटीच्या बातम्यांनी वेग घेतला असतांनाच पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच वादाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बंटी शेळके त्यांनी केलेले आरोप ते मागे घेतात कि त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहतात हे पाहण्यासारखं असणार आहे. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसnagpurनागपूरNana Patoleनाना पटोले