शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

दीक्षाभूमीवर शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा; बुद्ध महोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2023 22:20 IST

Nagpur News बुद्धजयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे चार दिवसीय बुद्ध महोत्सवाला प्रारंभ झाला.

नागपूर : बुद्धजयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे चार दिवसीय बुद्ध महोत्सवाला प्रारंभ झाला. गुरुवारी सायंकाळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते शंभर बालकांसह ज्येष्ठांनाही श्रामणेरची दीक्षा देण्यात आली.

दीक्षाभूमीच्या प्रांगणात लहान लहान बालक डोक्यावरचे केस काढून पालकांसह उपस्थित झाले. श्रामणेरची दीक्षा घेण्यासाठी सर्व बालक रांगेनी बसले. त्यांच्या पाठीमागे पालक बसले होते. पालकांचा आशीर्वाद घेतल्यानंतर बालकांनी भिक्खूचेही आशीर्वाद घेतले. अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर भदंत ससाई यांच्याकडून त्रिशरणासह दशशील ग्रहण केले. सोबतच आयुष्यभर तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला. यानंतर उंटखाना येथील बुद्धिस्ट सेमिनरीत या सर्व श्रामणेरांना निवासी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. या शिबिरादरम्यान भिक्खू संघ पाच दिवस बुद्ध, धम्म आणि संघ याविषयी मार्गदर्शन करतील.

याप्रसंगी भदंत थेरो धम्मसारथी, भदंत थेरो नागवंश, भदंत धम्मप्रकाश, भदंत भीमा बोधी, भदंत नागसेन, भदंत धम्मविजय, भदंत मिलिंद, भदंत नागाप्रकाश, भदंत अश्वजित, भदंत राहुल, भिक्खुनी किसा गौतमी, शीलानंदा, संघशिला, विशाखा, धम्मप्रिया, कुंडलिका, भिक्खूनी संघप्रिया उपस्थित होत्या. कार्यक्रमाला दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे यांच्यासह समितीचे सदस्य, समता सैनिक दलाचे प्रदीप डोंगरे, बालकदास बागडे उपस्थित होते.

भिक्खू संघाचे उद्या प्रवचन

भदंत सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भदंत नागवंश, भदंत धम्मप्रकाश, भिक्खूनी संघप्रिया, नागकन्या, शीलानंदा आदींसह भिक्खू संघ करूणा, शांती, मैत्री आणि बुद्धांचा कल्याणाचा मार्ग यावर मार्गदर्शन करतील.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमा