शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निसर्गरंगी रंगला सखी मंचचा ‘श्रावण सोहळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:27 PM

लोकमत सखी मंचच्यावतीने व स्टार प्रवाह आणि मधूर शुगरच्या सहयोगाने आयोजित ‘श्रावण सोहळा’ गुरुवारी सक्करदरा येथील बुधवार बाजारात असलेल्या संताजी सभागृहात उत्साहात पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत सखी मंचच्यावतीने व स्टार प्रवाह आणि मधूर शुगरच्या सहयोगाने आयोजित ‘श्रावण सोहळा’ गुरुवारी सक्करदरा येथील बुधवार बाजारात असलेल्या संताजी सभागृहात उत्साहात पार पडला.

ज्या प्रमाणे श्रावणात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते आणि त्यामुळे, मन उल्हासित होत असते, अगदी त्याच धर्तीवर कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सर्व सखी हिरव्या रंगाच्या साड्या घालून आल्या होत्या. त्यामुळे, संपूर्ण सोहळा निसर्गाच्या रंगात रंगून गेला होता. दरम्यान, सखींकरिता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका ‘मोलकरीण बाई’मध्ये आदिती प्रधानची भूमिका साकारणारी गायत्री सोहम, विनोदी मालिका ‘एक टप्पा आऊट’चे कलावंत शंतनू व प्रवीण आकर्षणाचे केंद्र ठरले. माऊली ग्रुपच्या वतीने ‘मंगळागौर’चे सादरीकरण करण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.सोहळ्यात उपस्थित महिला आणि सखींना मधूर शुगर, रोकडे ज्वेलर्स आणि विप्रोच्या वतीने भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमात मधूर शुगरच्या वतीने रिजनल सेल्स हेड मंगेश पवार, असिस्टंट ब्रॅण्ड मॅनेजर झिशन सिद्दीकी, एरिया सेल्स मॅनेजर योगेश तकरेजा, पाक विशेषज्ज्ञ स्नेहल दाते, समाजसेविका डॉ. प्रीती मानमोडे, पूजा धांडे उपस्थित होते. कार्यक्रमाला रोशनी शेगांवकर, वसुधा गुढे व कीर्ती शेंडे यांनी विशेष सहकार्य केले. संचालन नेहा जोशी यांनी केले.विविध स्पर्धंतील विजेते

  •  स्टार प्रवाह महाराणी - विजेता : रूपाली टिचकुले, प्रोत्साहन पुरस्कार : श्रुती भाटकर, संध्या पळसुले
  •  नऊवारी फॅशन शो - प्रथम : भक्ती कुवे, द्वितीय : शुभांगी नानवटकर, तृतीय : स्नेहा बावणे, प्रोत्साहन : ज्योत्स्ना नगरारे, अर्चना पगाडे
  •  उखाणे स्पर्धा - प्रथम : डॉ. अर्चना देशमुख, द्वितीय : संगीता पिसाळ, तृतीय : रोशनी शेगांवकर, प्रोत्साहन : संध्या वरघडे, शिला शेटे
  •  मधूर व्यंजन स्पर्धा - प्रथम : मंजुषा सुपेकर, द्वितीय : वसूधा गुढे, तृतीय : विशाखा करंजीकर, प्रोत्साहन : जया मुळे, मनिषा पंडित
  •  मेंदी स्पर्धा - प्रथम : मीनाक्षी जुमळे, द्वितीय : दीक्षा दमके
  •  श्रावण क्वीन स्पर्धा - प्रथम : चेतना पडोळे, द्वितीय : सुनैना भोंडे
  •  वेशभूषा - प्रथम : मंथन जलितकर, द्वितीय : आशा खेडकर, तृतीय : द्विती डवले
टॅग्स :Lokmat Sakhi Manch Nagpurलोकमत सखी मंच नागपूर