शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

श्रीराम आणि अयोध्येतील मंदिराच्या नाण्यांची धूम; लाकडी प्रतिकृती विक्रीस

By मोरेश्वर मानापुरे | Published: January 09, 2024 7:30 PM

भक्तांची मोठ्या प्रमाणात खरेदी : श्रीरामाच्या सोने-चांदीच्या फ्रेम, कॉर्पोरेट क्षेत्राकडून मागणी

नागपूर : अयोध्येत भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. या निमित्ताने सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. श्रीरामाची प्रतिकृती असलेले वस्त्र तयार करण्यात येत आहेत तर पूजेसाठी उपयोगात येणाऱ्या सामग्रीची रेलचेल दिसून येत आहे. अर्थात नागपुरातील सर्वच बाजारपेठा राममय झाल्या आहेत. २२ जानेवारी हा दिवस दिवाळी म्हणून साजरा करण्याचा लोकांचा मानस आहे. या निमित्ताने भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

बाजारात श्रीराम मंदिराचे लाकडी मॉडेल विक्रीस असून सोने-चांदीचे नाणे, फ्रेम, मूर्ती, धनुष्य विक्रीस असून भक्त मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. चांदीच्या एका बाजूला श्री रामाची मूर्ती तर दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या मॉडेल तयार केले आहे. याशिवाय श्री रामाचे लॉकेट, अंगठी आदींसह अन्य वस्तूही सराफांकडे विक्रीस आहेत. श्री रामाची प्रतिकृती असलेले सोने आणि चांदीच्या नाण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. चांदीचे नाणे एक हजार ते १० हजार आणि सोन्याचे नाणे, फ्रेम व अन्य वस्तू ५ हजार ते ५ लाखांपर्यंत विक्रीस आहेत. याशिवाय श्रीराम-सीतेची प्रतिकृती असलेले अलंकार मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.

भेटवस्तूंनाही मोठी मागणीभगवान श्रीराम-सीता, लक्ष्मण, पवनसूत हनुमानची प्रतिकृती असलेल्या फ्रेम, श्रीरामाच्या पादुका, मंदिराचे चांदीचे मॉडेलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वजनानुसार मॉडेलची किंमत आहे. तसेच रामदरबारची प्रतिकृती असलेले सोने-चांदीचे नाणे उपलब्ध आहेत.

राममंदिराच्या नाण्यांची मागणी वाढलीआधी दसरा-दिवाळीत भेटस्वरुपात श्रीगणेश आणि लक्ष्मीचे नाणे देण्यात येत होते. पण आता अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने लोकांमध्ये श्रीराम आणि मंदिराची प्रतिकृती असलेले सोने आणि चांदीचे नाणे भेटस्वरुपात देण्याची चलन वाढली आहे. २२ जानेवारीपर्यंत नाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे अनेकांनी आधीच बुकिंग केल्याचे नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले.

मंदिराचे लाकडी मॉडेलफर्निचर व्यावसायिकांनी मंदिराचे लाकडी मॉडेल विक्रीस आणले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत, पण २२ जानेवारीपर्यंत बाजारात सर्वत्र उपलब्ध होतील, असे व्यावसायिक म्हणाले. लाकडी मंदिराचे ऑर्डर वाढले आहेत. लहानमोठ्या लाकडी मंदिराच्या मागणीत वाढ झाली आहे. 

अयोध्येत भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार असल्याने सराफा बाजारात प्रचंड उत्साह आहे. नाणे, चेन, लॉकेट, फ्रेम आणि अन्य वस्तूंची भक्तांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. तसेच भेटवस्तू देण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राकडून सोने-चांदीच्या नाण्यांना प्रचंड मागणी आहे. अर्थात सराफा बाजारात श्रीरामाच्या वस्तूंची धूम आहे. बाजार राममय झाला आहे. राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर