श्रीकांत सिंग, एस. के. श्रीवास्तव यांना अवमानना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 09:49 PM2018-03-16T21:49:26+5:302018-03-16T21:49:35+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात गृह विभागाचे सचिव श्रीकांत सिंग, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव एस. के. श्रीवास्तव व इतर प्रतिवादींना अवमानना नोटीस बजावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात गृह विभागाचे सचिव श्रीकांत सिंग, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव एस. के. श्रीवास्तव व इतर प्रतिवादींना अवमानना नोटीस बजावली.
गोंदिया येथील दिवंगत निहाल गवळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते हे घोषित करण्यासाठी व त्यांना यासंदर्भात प्रमाणपत्र देण्यासाठी दत्तक पुत्र ओमप्रकाश यादव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ६ मार्च २०१७ रोजी न्यायालयाने याचिका निकाली काढून या प्रकरणावर तीन महिन्यात निर्णय घेण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. सरकारने त्या आदेशाचे पालन केले नाही असा यादव यांचा आरोप आहे. त्यांनी न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सर्व प्रतिवादींना १० एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. विशाल आनंद यांनी बाजू मांडली.