- योगेश कृष्ण महाराज यांचे उद्गार
नागपूर : बेलतरोडी येथील आनंदवर्धन हनुमान मंदिरात शुक्रवारी सर्वजन कल्याणार्थ सामूहिक संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञान महोत्सवास प्रारंभ झाला. कथावाचक योगेश कृष्ण महाराज यांनी पहिल्या दिवशी कथा महात्म्याचे वर्णन करताना श्रीमद् भागवत कथा जनहितकारी, कल्याणकारी व सर्वांना योग्य मार्गावर नेणारी असल्याचे ते म्हणाले. आरती बालकुमुंद मिश्रा, चंद्रकला मिश्रा, रविशंकर मिश्रा, श्यामवती मिश्रा, शिवानंद तिवारी, सविता तिवारी, बाबूलाल तिवारी, दयावती तिवारी, इंद्रजित दुबे, द्रौपदी दुबे, राधिका मिश्रा, रमा मिश्रा यांनी केली. तत्पूर्वी श्रीमद् भागवत कथेची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत जयमान कुटुंबाने माथ्यावर भागवत पोथी धारण करत कथास्थळापर्यंत नेली. ढोल ताशाच्या गजरात मंगल कलश धारण करत ५१ महिला यात सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रा निरंजन नगरचे भ्रमण करत कथा स्थळावर पोहोचली. येथे भागवत पोथीचे पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली.