लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी याच्याविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला.जोशीने जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, त्याचा अर्ज मंजूर करण्यास नकार दिला. त्यामुळे जोशीने अर्ज मागे घेतला. परंतु, न्यायालयाने विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश दिल्यामुळे जोशीला काही प्रमाणात दिलासा मिळाला. जोशीने २००३ मध्ये गुंतवणूक क्षेत्रात प्रवेश केला होता. त्याने अनेक कंपन्या नुकसानीत सुरू असतानाही फायद्याचे प्रलोभन दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना फसविले. या प्रकरणात राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायद्याच्या कलम ३ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. जोशीला १५ आॅक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे. जोशीतर्फे अॅड. साहिल भांगडे तर, सरकारतर्फे अॅड. सुमंत देवपुजारी व अॅड. नीरज जावडे यांनी बाजू मांडली.
श्रीसूर्यावरील खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:12 AM
शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी याच्याविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला.
ठळक मुद्देहायकोर्ट : जामीन मंजूर करण्यास नकार दिला