शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गृहमंत्र्यांना भेटणार, पोलिसांच्या उत्तरानंतर अंनिसची भूमिका; बागेश्वर बाबांचा वाद कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 18:01 IST

पोलिसांकडून मिळालेल्या उत्तरानंतर अंनिसचे श्याम मानव यांनी आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.  

नागपूर  - दिव्य दरबारवरून चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांना नागपूरपोलिसांनी ‘क्लीन चिट’ दिली आहे. नागपुरात झालेल्या त्यांच्या कार्यक्रमादरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ चे कुठेही उल्लंघन झालेले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर पोलिसांनी संपूर्ण व्हिडीओजची तपासणीही केली होती. पोलिसांकडून मिळालेल्या उत्तरानंतर अंनिसचे श्याम मानव यांनी आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.  

पोलिसांकडून जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांचे दावे खोडले गेल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, श्याम मानव यांनी आता थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच, याप्रकरणी गुन्हाही दाखल होऊ शकतो, यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासणार असल्याचंही ते म्हणाले.  

याप्रकरणी पूर्णतः कायद्याचं उल्लंघन झाला असताना पोलिसानी नकार दिला आहे. जर कोणी देवाच्या नावावर आश्वासन देत असेल तर अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा देणं या जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे, असे श्याम मानव यांनी म्हटले. तसेच, पोलिसांवर कुणाचातरी दबाव असल्याचे सांगत, आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटणार. त्यानंतरच, कोर्टाच्या प्रक्रिये बद्दल ठरवणार असल्याचंही श्याम मानव यांनी सांगितले. 

धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध अमरावतीत आंदोलन

देशभरात धिरेंद्र शास्त्री महाराजांचे नाव चांगलेच चर्चेत आले असताना, त्यांच्या नागपूर येथील कार्यक्रमानंतर अंनिसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता धिरेंद्र शास्त्रींकडे संशयाच्या भूमिकेतून बघितल जातंय. त्यातच, छत्रपती सेनेच्यावतीने अमरावतीमध्ये धिरेंद्र शास्त्रींच्या अटकेच्या मागणीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सोबतच धिरेंद्र शास्त्रींनी आमच्या 21 लोकांच्या एटीएमचे पासवर्ड सांगितल्यास त्यांना 21 लाखांचे इनाम देण्याची घोषणाही करण्यात आली.

 

टॅग्स :nagpurनागपूरbageshwar dhamबागेश्वर धामshyam manavश्याम मानवPoliceपोलिस