हनुमान जयंती उत्साहात : शहरात विविध ठिकाणी भजन, कीर्तन, अभिषेक, महाप्रसादाचे आयोजननागपूर : पवनसुत हनुमान की जय, सीयावर रामचंद्र की जय... संकटमोचक नाम तिहारो...अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान...अशा हनुमानाचा जयघोष करणाऱ्या गीतांनी मंगळवारी नागपूरनगरी दणाणून गेली. हनुमान जयंतीनिमित्त शहरातील विविध हनुमान मंदिरात मंगळवारी सकाळपासूनच भजन, कीर्तन, अभिषेक, पूजा, महाआरती, सत्यनारायण पूजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजाबाक्षा, तेलंगखेडी या प्राचीन हनुमान मंदिरातून विविध नयनरम्य देखाव्यांसह शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी अयप्पा सेवा समितीच्या वतीने साकारण्यात आलेली ३२ फुटांची हनुमानाची मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. नाट्योत्सवात रंगला सोहळाहेमेंदू रंगभूमीचे आयोजन : ‘श्री तशी सौ’,‘मन चिंब झाले’चे सादरीकरण नागपूर : हनुमान जयंतीच्या निमित्ताने श्रीकृष्णनगर, वाठोडा येथील श्री हनुमान मंदिर पंचकमिटीतर्फे व हेमेंदू रंगभूमीच्यावतीने ९ व १० एप्रिल रोजी द्विदिवसीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ‘श्री तशी सौ’व ‘मन चिंब झाले’ या दोन एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी ९ एप्रिल रोजी कॅटचे नागपूर अध्यक्ष किशोर धाराशिवकर व प्राचार्य सुभाष वऱ्होकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भवन्सच्या कलासृजनतर्फे भरनाट्यमचे सादरीकरण करण्यात आले़ यात श्रीमती माडखोलकर यांचे शिष्य रेवा जैन, मधुरा हमदापुरे, प्राची गोसावी, वैष्णवी मुकवाणे व अतुल शेबे यांनी नृत्य सादर केले़ यानंतर योगेश सोमण लिखित व अतुल शेबे दिग्दर्शित ‘श्री तशी सौ’ या विनोदी कौटुंबिक एकांकिकेत वैवाहिक बंधनात अडकल्यानंतर, काही वर्षे एकमेकांच्या प्रेमात पडावे आणि नंतर, त्याच प्रेमाचे पर्यवसान गोड भांडणात व्हावे, असे कथानक प्रेक्षकांना भावले. या नाटकात अतुल शेबे व वैदेही चवरे-सोईतकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या़ संगीत राजेश खैरकार, प्रकाशयोजना ऋषभ धापोडकर, नेपथ्य मुग्धा देशकर व प्रशांत गाडे, रंगमंच व्यवस्था रोहित अयाचित व कपिल रोटकर आणि रंगभूषा व वेशभूषा शुभांगी सरोदे यांची होती़ सोमवारी प्रवीण खापरे लिखित व अतुल शेबे दिग्दर्शित मन चिंब झाले या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले़ ज्येष्ठ रंगकर्मी कल्पना गडेकर व अभिनेता-दिग्दर्शक पराग भावसार यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते़ या एकांकिकेत प्रेमाचा अनाहूत प्रवास साकारण्यात आला़ अजिंक्य अणे व मुग्धा देशकर यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या़ बालकलावंत हृदय कोल्हे, वेदांग, पुष्कर जोध यांनीही सुरेख अभिनय केला. संगीत राजेश खैरकार, प्रकाश योजना ऋषभ धापोडकर, नेपथ्य प्रशांत गाडे, रोहित अयाचित, कपिल रोटकर, रंगभूषा व वेशभूषा अतुल शेबे, वैदेही चवरे-सोईतकर यांची होती.
संकटमोचक नाम तिहारो...
By admin | Published: April 12, 2017 2:17 AM