लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. हा प्रकार विद्यापीठाने गंभीरतेने घेतला असून ‘मॉडरेशन’च्या वेळी झालेल्या चुकीमुळे हा प्रकार झाल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात चौकशी समिती गठित करण्यात आली असून त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.यंदा ‘बीबीए’ प्रथम सत्राचा अभ्यासक्रम बदलविण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी पहिलाच पेपर होता. सोबतच जुन्या अभ्यासक्रमानुसार ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांचाही पेपर होता. सकाळी ९.३० वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. वर्धा, भंडारा, नागपूर आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांतील १७ ते १८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होती. नवीन आणि जुन्या पेपरचा विषय सारखाच असल्याने अनेक विद्यार्थ्यांना चूक लक्षात आलीच नाही. मात्र काही विद्यार्थ्यांना ही तफावत लक्षात आली व तत्काळ त्यांनी ही बाब परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत परीक्षा भवनातदेखील कळविण्यात आले.प्रत्यक्षात ही चूक ‘मॉडरेशन’मधील त्रुटीमुळे झाल्याचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले. पाकिटे सीलबंद झाल्यानंतर त्यात नवीन अभ्यासक्रमाच्या ऐवजी जुन्या अभ्यासक्रमाचा उल्लेख करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना अहवाल सादर करणार आहे. जर यात ‘मॉडरेटर्स’ दोषी आढळले तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
नागपूर विद्यापीठाकडून ‘मॉडरेटर’वर कारवाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 1:21 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. हा प्रकार विद्यापीठाने गंभीरतेने घेतला असून ‘मॉडरेशन’च्या वेळी झालेल्या चुकीमुळे हा प्रकार झाल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात चौकशी समिती गठित करण्यात आली असून त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे‘बीबीए’ प्रश्नपत्रिका प्रकरण : चौकशी समिती गठित