शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आगीच्या ढिगाऱ्यावर नागपुरातील मस्कासाथ, रेशीम ओळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 8:04 PM

जंगल्याजी धोंडबाजी या फर्मच्या मस्कासाथ, रेशीम ओळ येथील प्लास्टिक व केमिकलचा साठा असलेल्या गोडाऊनला सोमवारी आग लागून कोट्यवधींचा माल जळाला. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला अथक परिश्रम घ्यावे लागले. नागपुरात अनेक दाट वस्त्यांमध्ये यासारखी अनधिकृत गोडाऊन बरीच असल्याने संपूर्ण वस्त्याच आगीच्या ढिगाऱ्यावर उभ्या आहेत.

ठळक मुद्देदाट वस्त्यांमध्ये प्लास्टिक व केमिकलचे गोडाऊन : अग्निशमन उपकरणांचा अभाव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जंगल्याजी धोंडबाजी या फर्मच्या मस्कासाथ, रेशीम ओळ येथील प्लास्टिक व केमिकलचा साठा असलेल्या गोडाऊनला सोमवारी आग लागून कोट्यवधींचा माल जळाला. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला अथक परिश्रम घ्यावे लागले. नागपुरात अनेक दाट वस्त्यांमध्ये यासारखी अनधिकृत गोडाऊन बरीच असल्याने संपूर्ण वस्त्याच आगीच्या ढिगाऱ्यावर उभ्या आहेत. अशा अनधिकृत गोडाऊनवर संबंधित विभागाने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिक आणि व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.मस्कासाथ आणि रेशीम ओळ भागातील दाट लोकवस्तीमध्ये ज्वलनशील पदार्थांची दुकाने आहेत. प्रत्येक दुकानांमध्ये केमिकलचा साठा आहे. एखाद्या दुकानाला आग लागली तर ती अन्य दुकानांमध्ये पसरण्यास वेळ लागत नाही. अनेकांची दुकाने लहान असली तरीही त्यांनी लोकवस्तीत गोडाऊन भाड्याने घेऊन ज्वलनशील पदार्थांचा साठा केला आहे. असेच गोडाऊन जागनाथ बुधवारी, चुना ओळ, टिमकी आणि लालगंजला जाणाºया मार्गावरील वस्त्यांमध्ये जवळपास ३०० च्या आसपास आहेत. सर्व गोडाऊनमध्ये भरपूर साठा आहे. अग्निशमन उपकरणांच्या नावावर त्यांच्याकडे शून्य उपाययोजना आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गोडाऊनची संख्या वाढतच आहे. या गोडाऊनची मनपाकडे कुठलीही नोंद नाही. मनपाच्या अधिकाऱ्यांनीही गोडाऊनची पाहणी करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे कारवाईचा प्रश्नच नाही. याच कारणाने प्लास्टिक आणि केमिकलचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांचा कुठलाही धाक उरला नाही. या सर्व अनधिकृत गोडाऊनची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी लोकमतकडे केली.जागनाथ बुधवारी येथील नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्य नागपूरचे अध्यक्ष मिलिंद मानापुरे म्हणाले, या भागातील वस्त्यांमधील लहान गल्ल्यांमध्ये नियम धाब्यावर बसवून व्यावसायिक संकुल आणि इमारती तयार करण्यात आलेल्या आहेत. तिथे आगीचे बंब जाऊ शकत नाहीत. बऱ्याच इमारतींमध्ये फायर अलार्म व आग विझविण्याची उपकरणे लावलेली नाही. या परिसरातील इमारतींचे ऑडिट करून नियमानुसार कार्यवाही करावी, जेणेकरून यानंतर मालहानी किंवा जीवितहानी होणार नाही.इमारतीतील गोडाऊनचे लवकरच सर्वेक्षण करणारमस्कासाथ, रेशीम ओळ, बंगाली पंजा, इतवारी, टिमकी, गांधीबाग या भागात अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात आहे. दाट वस्त्यांमध्ये अनेकांनी लहान जागेवर मोठे गोडाऊन बांधले आहेत. अनेकांच्या घरी कुटीर उद्योग आहेत. लहान बोळीत अनधिकृत बांधकामामुळे आग लागल्यानंतर आगीचे बंब जात नाही. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते. असाच प्रकार सोमवारी घडला. कोविड-१९ पूर्वी या भागाचे सर्वेक्षणाचे काम सुरू होते. लवकरच सर्वेक्षण सुरू करून अग्निशमन उपकरणांची तपासणी करणार आहे.राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा.

टॅग्स :fireआगMarketबाजार