शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

चांदी लाखावर, जीएसटीसह १,००,२१९ रुपये किंमत; जागतिक बाजारात जबरदस्त तेजी!

By मोरेश्वर मानापुरे | Published: October 19, 2024 8:17 PM

- एकाच दिवसात ३,८०० हजारांची वाढ :

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम जागतिक बाजारात दिसू लागला आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची मागणी वाढताच भारतासह स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली. शनिवारी एकाच दिवसात चांदी ३,८०० रुपयांनी वाढून भाव ९७,३०० रुपयांवर पोहोचले. सराफांकडे तीन टक्के जीएसटीसह भाव १,००,२१९ रुपयांवर गेले. अर्थात चांदीने एक लाखाचा आकडा पार केला. दरवाढीनंतरही ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी आहे.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारात सोने-चांदीच्या बाजारात जबरदस्त तेजी बघायला मिळत आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचेही भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्यात १९ दिवसांत जीएसटीविना शुद्ध चांदीचे प्रतिकिलो दर ५,१०० रुपयांची वाढले. शनिवारी दहा ग्रॅम सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ होऊन भाव ७८ हजारांवर गेले. तीन टक्के जीएसटीसह ८०,३४० रुपयांत विक्री झाली.

औद्योगिक क्षेत्राकडून प्रचंड मागणीमहागाईचा वाढता दबाव आणि सर्वच औद्योगिक क्षेत्रात मागणी वाढल्याने चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. तसे पाहता चांदीच्या दरात जानेवारीपासून हळूहळू वाढ होऊ लागली. यंदा केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलैला संसदेत सादर करण्यात आला. त्यादिवशी चांदीचे प्रतिकिलो भाव ८८,५०० रुपयांवर होते. चांदीवर ६ टक्के सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा होताच भाव २,७०० रुपयांची कमी होऊन ८५,८०० रुपयांवर स्थिरावले. २५ जुलैला पुन्हा ८२,२०० रुपयांपर्यंत घसरण झाली. मात्र, तेव्हापासून १९ ऑक्टोबरपर्यंत चांदीचे भाव किलोमागे तब्बल १५,१०० रुपयांनी वाढले. ऑक्टोबर महिन्याचा विचार केल्यास १ ऑक्टोबरला चांदीचे जीएसटीविना प्रतिकिलो ९२,२०० रुपये होते. ५ रोजी ९३,५००, १० रोजी ९०,५००, १६ ऑक्टोबरला ९१,७००, १७ रोजी ९२,२००, १८ रोजी ९३,५०० आणि १९ ऑक्टोबरला चांदीचे दर ९७,३०० रुपयांपर्यंत वाढले. तीन टक्के जीएसटीसह चांदीची १,००,२१९ रुपयांत विक्री झाली.

शुद्ध चांदीचे दर :महिना प्रतिकिलो भाव२५ जुलै ८२,२००१ ऑक्टो. ९२,२००५ ऑक्टो. ९३,५००१० ऑक्टो. ९०,५००१५ ऑक्टो. ९१,७००१६ ऑक्टो. ९३,०००१७ ऑक्टो. ९२,१००१८ ऑक्टो. ९३,५००१९ ऑक्टो. ९७,३००(उपरोक्त भावावर ३ टक्के जीएसटी वेगळा)

टॅग्स :Silverचांदी