शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘नोटाबंदी’मुळे अर्थव्यवस्थेची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:47 AM

नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विरोधकांकडून काळा दिवस पाळण्यात येत असताना, भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी शहरभरात आर्थिक विजय दिवस साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देभाजपाने साजरा केला ‘आर्थिक विजय दिवस’ : काळ्या पैशाचा केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विरोधकांकडून काळा दिवस पाळण्यात येत असताना, भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी शहरभरात आर्थिक विजय दिवस साजरा करण्यात आला. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे अभिनंदन सभांचे आयोजन करण्यात आले होते. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली असून, काळ्या पैशाविरोधातील या लढ्याला सामान्यांचीदेखील साथ लाभली असल्याचा पदाधिकाºयांचा सूर होता. विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये खा. अजय संचेती, आ. गिरीश व्यास तसेच शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.शहरातील सर्व मंडळांमध्ये सभांचे आयोजन करण्यात आले. दक्षिण पश्चिमची सभा प्रतापनगर चौक, मध्य नागपूरची सभा भारतमाता चौक, उत्तर नागपूरची सभा कमाल चौक, पूर्व नागपूरची सभा हिवरीनगर येथील भीम चौक, दक्षिण मंडळाची सभा सक्करदरा चौक तर पश्चिम नागपुरच्या सभेचे आयोजन रामनगर चौकात करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी गृहसंपर्कदेखील साधला.काँग्रेसने नैतिक अधिकार गमावला आहे : अजय संचेतीपश्चिम नागपुरात रामनगर चौकात भाजपतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा.अजय संचेती यांनी उपस्थितांना संबोधित केले. गेल्या ६५ वर्षांत देशामध्ये काँग्रेस व इतर मित्र पक्षांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला खिंडार पाडले. नकली नोटांवर नियंत्रण आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाने उचललेले ऐतिहासिक पाऊल अर्थव्यवस्थेला निश्चित मजबूत करणारे आहे. नोटाबंदीनंतर जनतेनेदेखील या निर्णयाला स्वीकारले. मात्र काळ्या पैशाने तिजोरी भरून ठेवलेल्या काँग्रेससह इतर पक्षांना हे रुचले नाही. उत्तर प्रदेशातील निवडणुकांमधील निकालांनी जनतेची भावना समोर आणलीच. त्यामुळे काँग्रेसने आता नैतिक अधिकारच गमावला आहे, असे अजय संचेती म्हणाले. भाजप पश्चिम मंडळ अध्यक्ष किशन गावंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता, भूषण शिंगणे हेदेखील उपस्थित होते. सतीश वडे यांनी आभार मानले.मध्य नागपूर भाजपतर्फे भारतमाता चौक येथे नोटाबंदीसाठी अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात आले होते. आ.गिरीश व्यास व नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी या सभेला संबोधित केले. संपुआच्या काळात काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद यांचे प्रमाण टोकाला गेले होते. मात्र नोटाबंदीच्या एका निर्णयाने या सर्वांवर नियंत्रण आले. अर्थव्यवस्थेला नोटाबंदीने सांभाळले असून, एक नवी सुरुवात झाली आहे. कोट्यवधी लोकांनी याला आनंदाने स्वीकारले, असे व्यास म्हणाले. यावेळी उपमहापौर, माजी महापौर अर्चना डेहनकर, मध्य मंडळ भाजपचे अध्यक्ष सुधीर ऊर्फ बंडू राऊत, महामंत्री किशोर पलांदूरकर, विलास त्रिवेदी, हाजी अब्दुल कादीर, अश्फाक पटेल, वंदना यंगटवार, राजेश घोडपागे, बाळू बांते, श्याम चांदेकर, राहुल खंगार, दीपांशु लिंगायत, दशरथ मस्के, अशोक नायक, सरला नायक, प्रमोद दहिकर, संजय महाजन, सचिन राठोड, गोपाल बनकर, सुमेधा देशपांडे, शकुंतला पारवे, आशिष पारधी इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. अमोल ठाकरे यांनी संचालन केले तर कल्पक भनारकर यांनी आभार मानले.अर्थव्यवस्थेला नवी दिशा : कृष्णा खोपडेपूर्व नागपूर मंडळातर्फे हिवरीनगर येथील भीम चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.कृष्णा खोपडे यांनी संबोधन केले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नवीन दिशा मिळाली आहे. दहशतवाद, काळा पैसा यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण ठरला आहे. काँग्रेसच्या नेत्यांचे या निर्णयामुळे वैयक्तिक नुकसान झाले. त्यामुळे ते काळा दिवस पाळत आहेत, असे खोपडे म्हणाले. यावेळी मंचावर प्रमोद पेंडके, महेंद्र राऊत, बंटी कुकडे, धर्मपाल मेश्राम, हरीश दिकोंडवार, प्रदीप पोहाणे, राजकुमार सेलोकर,दीपक वाडीभस्मे,वंदना भुरे प्रामुख्याने उपस्थित होते. बाल्या रारोकर यांनी संचालन केले, तर संजय अवचट यांनी आभार मानले.आमदारांकडे इतर मतदारसंघांची जबाबदारीदरम्यान, बुधवारी झालेल्या कार्यक्रमांमध्ये शहरातील काही आमदारांची उपस्थिती नव्हती. याचे कारण म्हणजे प्रत्येक आमदाराकडे राज्यातील इतर मतदारसंघातील कार्यक्रम व सभांची जबाबदारी देण्यात आली होती. शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे हे परभणीत होते. तर काही आमदार मुंबईच्या जवळील मतदारसंघांमध्ये होते, अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख चंदन गोस्वामी यांनी दिली.