- भगवान महावीर यांचे सिद्धांत आत्मसात करा
वर्तमान परिस्थितीत भगवान महावीर यांचे सिद्धांत आत्मसात करण्याची गरज आहे. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य महावीरांची विचारधारा आहे. त्यांचे जीवन दर्शन व सिद्धांत आचरणात आणल्यास हिंसा, कलह, संघर्ष समाप्त होईल.
संतोष जैन पेंढारी
- भगवान महावीर आधुनिक लोकतंत्राचे अनुशासक
भगवान महावीर आधुनिक लोकतंत्राचे अनुशासक आहेत. आज कोरोना संक्रमणाच्या काळात ऑक्सिजनचे जे संकट उभे ठाकले आहे, त्यासाठी मानव स्वत: जबाबदार आहे. भगवान महावीरांचा रत्नत्रय सम्यक दर्शन, ज्ञान व चारित्राणी मोक्ष मार्ग आहे.
-रजनीश जैन
- प्रेम, दया, करुणेची आवश्यकता
भगवान महावीर अहिंसेचे अवतार होते. त्यांचा सिद्धांत अहिंसा होता. प्राणिमात्रांवर ते दया दाखवित होते. ‘जगा आणि जगू द्या’, असा त्यांचा सिद्धांत होता. याच सिद्धांतावर आपल्याला आपल्या जीवनात आचरण करायचे आहे.
सतीश पेंढारी