लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिंदेवाही नगर पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरील स्थगितीला नगरसेविका आशा गंडाते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने राज्य सरकार व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी सुुरुवातीला २४ जून रोजी अध्यक्षपदाची निवडणूक निश्चित केली होती. गंडाते यांनी त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यावर हितेश सूचक यांनी आक्षेप दाखल करून गंडाते निवडणुकीसाठी अपात्र असल्याचा दावा केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळल्यानंतर सूचक यांनी नगर विकासमंत्र्याकडे अपील केले होते. नगर विकासमंत्र्यांनी निवडणुकीवर स्थगिती देऊन ते प्रकरण निर्णयाकरिता विभागीय आयुक्तांकडे वर्ग केले होते. २६ जून रोजी विभागीय आयुक्तांनी सूचक यांचे अपील खारीज केले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी २९ जून ही सुधारित तारीख जाहीर केली होती. दरम्यान, नगर विकासमंत्र्यांनी २८ जून रोजी वादग्रस्त आदेश जारी करून निवडणुकीवर स्थगिती दिली. त्यावर याचिकाकर्तीचा आक्षेप आहे. हा आदेश अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्तीतर्फे अॅड. रफिक अकबानी यांनी कामकाज पाहिले.
सिंदेवाही नगर पंचायत : अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरील स्थगितीला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 9:29 PM
सिंदेवाही नगर पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरील स्थगितीला नगरसेविका आशा गंडाते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने राज्य सरकार व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ठळक मुद्देहायकोर्टात याचिका