शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

Corona Virus in Nagpur; एकच व्हेंटिलेटर दोन रुग्णांसाठी वापरता येणार; व्हीएनआयटीने विकसित केले व्हेंटिलेटर स्प्लिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:34 PM

संपूर्ण देशासह उपराजधानीदेखील कोरोनाशी लढा देत असताना वैद्यकीय क्षेत्रासमोर व्हेंटिलेटर्सच्या कमतरतेची चिंता निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन व्हीएनआयटीत विशेष संशोधन करण्यात आले व विशेष व्हेंटिलेटर स्प्लिटर विकसित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोना वॉरिअर्सला संशोधनातून साथ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संपूर्ण देशासह उपराजधानीदेखील कोरोनाशी लढा देत असताना वैद्यकीय क्षेत्रासमोर व्हेंटिलेटर्सच्या कमतरतेची चिंता निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन व्हीएनआयटीत विशेष संशोधन करण्यात आले व विशेष व्हेंटिलेटर स्प्लिटर विकसित करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून एकच व्हेंटिलेटरचा दोन रुग्णांसाठी एकाच वेळी वापर करणे शक्य होणार आहे. हे स्प्लिटर्स इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परीक्षणासाठी देण्यात आले आहेत.कोरोनाबाधितांची प्रकृती बिघडल्यानंतर श्वास घेण्यास अडथळे येतात व अशा वेळी व्हेंटिलेटर अत्यावश्यक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात केवळ ४८ हजार व्हेंटिलेटर्स आहेत. ही कमी संख्या वैद्यकीय क्षेत्रासमोर चिंता बनली आहे. यासंदर्भात संशोधनासाठी मेयोतील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांना संपर्क केला होता. डॉ. पडोळे हे स्वत: बायोमेडिकल अभियांत्रिकीमध्ये कार्य करत असल्याने त्यांनी यात पुढाकार घेतला. अथक प्रयत्नांनंतर टू वे व्हेंटिलेटर स्प्लिटर विकसित करण्यात आले. यात डिजिटल मॅन्युफॅक्च रिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात आला.व्हीएनआयटीतर्फे हे स्प्लिटर परीक्षणासाठी मेयोला सुपूर्द करण्यात आले व तेथे एनास्थेसिआॅलॉजीच्या प्रोफेसर डॉ. वैशाली शेलगावकर यांनी ट्रायल्स घेतले. घनफळ व दबाव या दोन्ही मोडवर याचे परीक्षण झाले. या यंत्रामुळे डॉक्टर एकाच व्हेंटिलेटरचा दोन रुग्णांसाठी उपयोग करु शकणार आहेत. आपात्कालीन स्थितीत व्हेंटिलेटरला एक किंवा अधिक स्प्लिटर जोडले तर एकाच वेळी चार रुग्णांवर उपचार होऊ शकतात. परंतु वास्तविक उपचारांदरम्यान असा प्रयोग धोकादायक असू शकतो. परंतु निश्चितपणे या स्प्लिटरमुळे समान रोगचिकित्सा असलेल्या दोन रुग्णांवर एकाच व्हेंटिलेटरच्या माध्यमातून उपचार होऊ शकतात, असे डॉ. शेलगावकर यांनी सांगितले. व्हीएनआयटीचे डॉ. शीतल चिद्दरवार व अभिजीत राऊत यांच्या प्रयत्नांतून स्प्लिटर व स्ट्रेन रिलिव्हर विकसित करण्यात आले. मेयोकडून डॉ. शेलगावकर यांच्यासह डॉ. मेधा संगावार, डॉ. उमेश रमतानी, डॉ. समृद्धी, डॉ. केतन व डॉ. नागेश यांचे सहकार्य लाभले.मास्कमुळे येणार नाही कानांवर ताणयासोबतच व्हीएनआयटीने वैद्यकीय तज्ज्ञांना दिलासा देणारे संशोधनदेखील केले आहे. सतत एन-९५ किंवा इतर मास्कचा उपयोग केल्याने डॉक्टरच्या कानांची अनावश्यक ओढाताण होते. व्हीएनआयटीने इअर स्ट्रेन रिलिव्हर तयार केले आहे. मास्कच्या इलेस्टिकवर याचे रोपण केले असता कानांवरचा हा ताण नाहीसा होऊ शकतो, असा दावा व्हीएनआयटीतर्फे करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस