नागपूर : कुख्यात रंजित सफेलकर टाेळीचा सदस्य श्रीनिवास ऊर्फ सिनू अन्ना याची पाेलीस काेठडी १८ मेपर्यंत वाढविण्यात आली. गुन्हे शाखा पाेलिसांनी मनीष श्रीवास हत्याकांडात सफेलकर टाेळीविरुद्ध मकाेकाअंतर्गत कारवाई केली हाेती. या प्रकरणात रंजित सफेलकर, कालू हाटे, भरत हाटे, हेमलाल ऊर्फ हेमंत नेपाली, विशाल ऊर्फ इसाक मस्ते आणि विनयकुमार ऊर्फ गाेलू बाथव यांना अटक केली आहे. यांच्या चाैकशीदरम्यान सिनूसुद्धा या हत्याकांडात सहभागी असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर २८ एप्रिल राेजी त्याला अटक करण्यात आली. १२ मेपर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्यात आले हाेते. कस्टडी संपल्यानंतर बुधवारी त्याला मकाेका न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने त्याची कस्टडी वाढविण्याची विनंती केली, जी न्यायालयाने मान्य करीत १८ मेपर्यंत काेठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.
गांजातस्कर ‘मेंटल’ला अटक
नागपूर : मानकापूर पाेलिसांनी गांजातस्करीचा आराेपी बाल्या ऊर्फ नितीन ऊर्फ मेंटल बंडू अंबादे (४०) रा. झिंगाबाई टाकळी, जुनी वस्ती याला अटक केली. पाेलिसांनी मंगळवारी मेंटलच्या घरी दबा देऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून ८५०० रुपये किमतीचा ८८० ग्रॅम गांजा सापडला. त्याला अटक करून अमली पदार्थ निराेधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
शस्त्रासह सापडला आराेपी
नागपूर : यशाेधरा पाेलिसांनी गाेंधळ घालणाऱ्या आराेपी राम कहालकर याला अटक केली. मांडवा झाेपडपट्टी निवासी १९ वर्षीय आराेपी राम मंगळवारी रात्री माजरी परिसरात शस्त्राच्या धाकावर लाेकांना धमकी देत गाेंधळ घालत हाेता. यावेळी दबा धरून असलेल्या पाेलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले. शस्त्रविराेधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.