शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
3
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
4
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
5
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
6
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

सर...लहान मुले किडनॅप झाली तर काय करावे...? विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांकडून जाणून घेतली पोलीस विभागाची कार्यप्रणाली

By योगेश पांडे | Published: November 28, 2024 11:44 PM

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस विभागाचा तपास, काम करण्याची प्रणाली याबाबत जाणून घेतले.

नागपूर : पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी ‘थँक्स गिव्हिंग डे’ निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस विभागाचा तपास, काम करण्याची प्रणाली याबाबत जाणून घेतले. वाहतुकीचे नियम पाळणे का आवश्यक आहे हे जाणून घेत असतानाच विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांना लहान मुले किडनॅप झाली तर काय करावे असे प्रश्न विचारत सुरक्षेबाबतदेखील ते किती दक्ष आहे हे दाखवून दिले.पोलीस भवनात आयोजित या कार्यक्रमात सहावी ते आठवीदरम्यानचे ३० शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एकमेकांबद्दल कृतज्ञ कसे राहावे व जीवनात सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा हे सांगितले. ‘थॅक्स गिव्हिंग डे’ हा एकमेकांबाबत आभार व्यक्त करण्याचा दिवस असतो. आभार व्यक्त केल्याने नातेसंबंध घट्ट होतात, मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होतो, असे ते म्हणाले. पोलीस तपास कसा करतात ? पोलीस घटनास्थळी पुरावे कसे गोळा केले जातात? डिजिटल पुरावे आणि त्यांचा उपयोग काय?सुरक्षेबाबत टिप्स कोणत्या? सोशल मीडियाचा गैरवापर झाल्यास काय करावे? इत्यादी प्रश्न यावेळी मुलांनी उपस्थित केली.

विद्यार्थ्यांनी बनावे ‘छोटा पोलीस’विद्यार्थ्यांच्या मनात अनेकदा पोलिसांबाबत भिती असते. मात्र ही भिती दूर सारून मुलांनीदेखील ‘छोटा पोलीस’ बनून मदत केली पाहिजे. पालकांनी वाहतुक नियमांचे पालन केले नाही तर घरी त्यांना दंड लावा असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसStudentविद्यार्थी