लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या अचानक झालेल्या उद्रेकामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात मोठ्या शहरात क्लास लावून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सर्व सोडून घरी परतावे लागले आहे. आता घरात बसून काय करावे हा प्रश्न त्यांना पडतो आहे. काहींनी आपली पुस्तके सोबत आणली तर काही मात्र तसच सोडून परतले आहेत. मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांनी निराश न होता युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांचा ऑनलाईन अभ्यास करावा, असे आवाहन प्राध्यापकांद्वारे केले जात आहे. सध्यातरी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे, मात्र परिस्थिती आटोक्यात आली नाही तर पुढेही अशीच स्थिती कायम राहू शकते. एप्रिल ते जूनपर्यंत ही परिस्थिती राहणे शक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे कंटाळवाणे वाटून घेण्यापेक्षा या काळाचा सदुपयोग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वर्तमान परिस्थितीत सोशल मीडियाचे प्रभावी माध्यम विद्यार्थ्यांजवळ उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून अभ्यास केला जाउ शकतो. पुस्तके नाही म्हणून घरी रिकामे न बसता सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करत आपला अभ्यास करता येईल. यासाठी इंटरनेटवर विविध वेबसाईट आहेत. ज्या अपडेट देखील करण्यात आल्या आहे. यावर माहितीसह काही पुस्तकांचे पीडीएफ देखील उपलब्ध आहे. यासोबतच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ देखील उपलब्ध आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होते . तसेच अभ्यास करण्यास अडचणी देखील येत नाही. या वेबसाइटचे लाखो युजर्स असले तरी या काळात नेहमीच्या तुलनेत अधिक विद्यार्थ्यांनी साईटचा वापर करावा. परीक्षेची तारीख पुढे ढकलली गेली असली तरी लवकरच परीक्षा होणार असल्याने या विद्याथ्यार्नी तंत्रज्ञानाचा वापर करत अभ्यास करावा, असा सल्ला प्राध्यापकांनी दिला आहे. आजच्या या आधुनिक आणी धकाधकीच्या काळात प्रत्येक तरुण हा शासकीय नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहे. यासाठी दिवसरात्र अभ्यास करत आहे. यात एरवी अभ्यासासाठी ग्रंथालयांमध्ये पुस्तकांच्या गराड्यात बसलेले तरुण पाहणे नित्याचे असले तरी सध्या कोरोनाच्या धास्तीने मात्र हे तरुण आपल्या गावी घरातच बसून आहे. तब्बल २१ दिवस घरातच रहावे लागणार असल्याने या तरुणांना आपला अभ्यास बुडण्याची मोठी चिंता लागून आहे. वेळ हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा असला तरी सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन अभ्यासाशिवाय दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही, हेही तितकेच खरे.या आहेत महत्वाच्या साईट -मिशन एमपीएससी गव्हर्नमेंट अड्डा एमपीएससी कट्टा एमपीएससी ट्रिक्स पीडीएफ फॉर एक्झाम यूपीएससी मटेरीअलएमपीएससी अलर्ट युएन कॅडमी एमपीएससी ठोकळा