कळमेश्वर/हिंगणा/काटोल/कामठी/नरखेड/उमरेड/रामटेक : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण भागात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागात लॉकडाऊन झाल्यास यास जबाबदार कोण राहील, असा प्रश्न विचारल्या जात आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात शुक्रवारी ३१७ रुग्णांची नोंद झाली. यातील ७४ रुग्ण सावनेर तर ६० रुग्ण कळमेश्वर तालुक्यातील आहेत. सावनेर शहरात १८ तर ग्रामीणमध्ये ५६ रुग्णांची नोंद झाली.
कळमेश्वर शहरात १६ तर ग्रामीण भागात धापेवाडा येथे १२, वरोडा (९), पान उबाळी (६), सोनपूर (५), सुसंद्री, तिडंगी आणि गौंडखैरी येथे प्रत्येकी दोन तर मोहपा, सवंद्री, मडासावंगी, निळगाव, झुनकी, बोरगाव येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली.
उमरेड तालुक्यात शुक्रवारी ११ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १,३२८ इतकी झाली आहे. यापैकी १,१८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही शहरात ५६ तसेच ग्रामीण भागात ४५ असे एकूण १०१ रुग्ण उपचार घेत आहेत.
गतवर्षी बाधितांचा टक्का अधिक असलेल्या कामठी तालुक्यातही आता रुग्णसंख्या वाढत आहे. शुक्रवारी येथे २४ रुग्णांची नोंद झाली. यात येरखेडा येथे ५, बजरंग पार्क (४), रनाळा (३), फुटाना ओळी, नया गोदाम, कोराडी, महादुला येथे प्रत्येकी दोन तर कवठा, भाजीमंडी परिसर, लोधीपुरा, नांदा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात १२ रुग्णांची भर पडली आहे. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील १० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २७२ तर शहरात ६५ इतकी झाली आहे. शुक्रवारी जलालखेडा, थाटूरवाडा, भिष्णूर येथे प्रत्येकी २ तर खापाघुडन, भारसिंगी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात २८ रुग्णांची भर पडली आहे. यात शहरात राजाजी वार्ड येथे ३ तर ग्रामीणमध्ये खडकी येथे ७, हिवरा बेंडे (६), वडांबा (५), करवाई, शिरपूर व शीतलवाडी येथे प्रत्येकी दोन आणि कांद्री येथे एका रुग्णाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.
काटोल ग्रामीणमध्ये धोका वाढला
काटोल शहरासोबत आता ग्रामीण भागात बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. तालुक्यात शुक्रवारी ४२ रुग्णांची भर पडली. यात काटोल शहरातील १२ रुग्ण तर ग्रामीण भागातील ३० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये कोंढाळी येथे चार, कारला, वाढोना, गोंडीमोहगाव, मसली, खामली, रिधोरा येथे प्रत्येकी दोन तर येरला, शिरसावाडी, येनवा, गोंडीदिग्रस, ढिवरवाडी, हरणखुरी, मुकणी, तांदुळवाडी, डोरली (भिंगारे), कचारी सावंगा, सबकुंड, चिखली (माळोदे), ढवळापूर, कामठी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगण्यात आणखी २५ रुग्ण
हिंगणा तालुक्यात शुक्रवारी ५६० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह झाले. यात वानाडोंगरी येथे १२, निलडोह (४), इसासनी व टाकळघाट येथे प्रत्येकी २, रायपूर, आमगाव, गिरोला, भारकस व कान्होलीबारा येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यातील बाधितांची संख्या ४५३७ इतकी झाली आहे. यातील ४०१३ रुग्ण बरे झाले आहेत, तर १०४ जणांचा मृत्यू झाला आहे.