अंकिता देशकर ।
नागपूर : सगळीकडेच एक नैराश्याचे वातावरण आहे आणि बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतोय की आता पुढे काय; पण असे असतानादेखील एक आशेचा किरण कानेर्गी मेलन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक बेईबेई ली यांनी दाखविला आहे. त्यांना असा विश्वास आहे की, गोष्टी आता बºयाच नकारात्मक आहेत आणि बाजारपेठदेखील मंदावली आहे; पण ही परिस्थिती फार काळ राहणार नाही, पुन्हा सगळं सुरळीत सुरू होईल, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’सोबत विविध विषयांवर चर्चा करीत असताना दाखवला. ‘लोकमत’ने कानेर्गी मेलन युनिव्हर्सिटी (सीएमयू)च्या प्राध्यापक बेईबेई ली यांच्यासोबत चर्चा करताना अमेरिका, भारत आणि चीन यांच्या संबंधांवरदेखील संवाद साधला.
ली म्हणाल्या, लोकांचे पगार कमी होत आहेत, तसेच त्यांच्या नोकºयादेखील चालल्या आहेत, बºयाच मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. बाहेर विद्यार्थ्यांना इंटर्नशिपदेखील मिळत नाही. सगळ्यांनीच या परिस्थितीचे आव्हान स्वीकारावे आणि कौशल्यामध्ये वाढ होईल असे कार्य करावे, नवीन काहीतरी शिकावे. कोरोना महामारीवर ली म्हणाल्या, एखाद्याने अशी अपेक्षा केली असती की, अमेरिकेसारख्या देशाने कोरोना व्हायरसमध्ये परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळायला हवी होती; पण अपेक्षेप्रमाणे काही झाले नाही, त्यामुळे आता सध्याच्या सरकारने यातून एक धडा घ्यायला हवा. त्या म्हणाल्या, इतर देशांच्या तुलनेत चीनने चांगले कामगिरी केली आहे.बरेच देश भारतात गुंतवणूक करतीलच्इतर देश भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यास इच्छुक असतील का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, भारताकडे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान संस्था आहेत, तसेच आता बरेच स्टार्टअप्स कौतुकास्पद काम करीत आहेत, त्यामुळे बरेच देश भारतात गुंतवणूक करतील, असा विश्वास त्यांना आहे.च्भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल त्या म्हणाल्या, जर भारतातील विद्यापीठांना परदेशी स्वत:चा विस्तार करायचा असेल तर त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यासक्रमात समावेश करून विद्यार्थ्यांना आकर्षित करावे.