शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपुरात महिलेच्या बँक खात्यातून साडेसहा लाख वळते : सायबर गुन्हेगाराचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 11:31 PM

प्रतापनगरातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेच्या खात्यातून सायबर गुन्हेगाराने केवायसी करण्याच्या नावाखाली चक्क ६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वळती करून घेतली.

ठळक मुद्देप्रतापनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगरातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेच्या खात्यातून सायबर गुन्हेगाराने केवायसी करण्याच्या नावाखाली चक्क ६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वळती करून घेतली. तर हिंगणा मार्गावरील बालाजीनगरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे २२ हजार रुपये लंपास केले. प्रतापनगर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडून शनिवारी सायंकाळी उघड झाली.

सुभाषनगरातील नेल्को सोसायटीत केतकी अमित थत्ते (वय ४४) राहतात. त्यांचे पती कंत्राटदार आहेत तर त्या गृहिणी असल्याचे पोलीस सांगतात.२८ एप्रिलला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये पेटीएम अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यांना केवायसी व्हेरिफिकेशन करणे जमले नाही त्यामुळे ते तसेच ठेवले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर ८५३७८९१४५९ या नंबरवरून फोन आला. आपण पेटीएम कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सायबर गुन्हेगाराने सांगितले. मी तुम्हाला पेटीएम व्हेरिफिकेशन करून देतो, असे म्हणून त्याने थत्ते यांना मोबाईलवर एक लिंक पाठविली. थत्ते यांनी ती लिंक डाऊनलोड केली. मात्र त्यात त्यांना आरोपीने सांगितलेली माहिती नमूद करता आली नाही. त्यामुळे आरोपीने त्यांचा दुसरा मोबाईल नंबर मागितला. त्या नंबरवर फोन करून फिर्यादीचे पेटीएम केवायसी व्हेरिफिकेशन झाल्याचे सांगून त्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये १०० रुपये भरण्यास सांगितले. थत्ते यांनी शंभर रुपये जमा केले असता आरोपीने त्यांना एक लिंक पाठविली आणि त्यावरचा ओटीपी नंबर, एक्सपायरी तारीख विचारून घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून पंधरा मिनिटात ६ लाख ४९ हजार ९९९ रुपये काढून घेतले.

हा प्रकार लक्षात आल्यावर थत्ते हादरल्या. त्यांनी प्रतापनगर पोलीस आणि नंतर सायबर शाखेत धाव घेतली. बँंकेच्या अधिकाºयांसोबतही संपर्क साधला. वेळीच हालचाल झाल्यामुळे आरोपीने ट्रान्सफर केलेल्या खात्यातील सुमारे पाच लाख रुपयांची रक्कम फ्रीज करण्यात आली. त्यामुळे थत्ते यांची ही रक्कम बचावली. उर्वरित रक्कम मात्र आरोपीने लंपास केली. या प्रकरणी शनिवारी प्रतापनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, एमआयडीसीत ८ एप्रिलला अशीच घटना घडली. हिंगणा मार्गावरील बालाजीनगरमध्ये राहणारे संतोष भास्कराव म्हसकर (वय ५२) यांच्या मोबाईलवर सायबर गुन्हेगाराचा फोन आला. पेटीएम कस्टमर केअर म्हणून बोलत असल्याचे सांगून आरोपीने म्हसकर यांना बँंक खात्याची माहिती विचारली. नंतर काही वेळेतच त्यांच्या एचडीएफसी बँक एमआयडीसी शाखा नागपूर येथील दोन अकाऊंटमधून २२,८०३ रुपये पेटीएममार्फत काढून घेतले. म्हसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर शाखेने चौकशी केल्यानंतर आज एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कानपूरच्या बँकेत रक्कम वळती

थत्ते यांच्या खात्यातून आरोपीने कानपूर(उत्तर प्रदेश)मधील सिंडिकेट बँकेच्या एका खात्यात रक्कम वळती केली होती. आरोपीने थत्ते यांना फसविण्यासाठी जो मोबाईल वापरला, तो बिहारमधील असल्याचे समजते. बिहार झारखंडच्या सीमेवर जामतारा गावात सायबर गुन्हेगारांची टोळी बसली आहे. ही टोळी अशाप्रकारे देशातील अनेकांना रोज लाखोंचा गंडा घालते. मात्र पोलिसांच्या हाती ही टोळी अपवादानेच लागते. दोन वर्षापूर्वी जामताऱ्याच्या अशाच एका टोळीतील आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने यश मिळवले होते. मात्र त्यानंतर हजारो लोकांची फसवणूक झाली. परंतु गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी