शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

महिनाभरात आढळले स्क्रब टायफसचे सहा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:22 PM

स्क्रब टायफसने यावर्षीही नागपूर जिल्ह्यात तोंड वर केले आहे. सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्यात ६ स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वातावरणामुळे विविध आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अशात स्क्रब टायफसने यावर्षीही जिल्ह्यात तोंड वर केले आहे. सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्यात ६ स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले आहेत.'ओरिएन्शिया सुसुगामुशी' नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा हा आजार आहे. पावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळतात. अतिशय सूक्ष्म जीवाणूमुळे हा आजार होतो. झाडेझुडूप, शेतामधील उंदीर, घुशी, इतर प्राण्यांच्या अंगावर तसेच वाढलेल्या गवतावर स्क्रबचा कीडा आढळून येतो. काही ठिकाणी हिवाळ्यातसुद्धा स्क्रबचे रुग्ण आढळतात. वेळेत औषधोपचार मिळाला नाही तर मृत्यू ओढावतो. नागपूरच्या मेडिकलमध्ये सप्टेंबर महिन्यात ६ रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दाखल झाले होते. त्यांच्यावर वेळीच योंग्य उपचार करुन त्यांना सुटी देण्यात आली आहे. या आजारामध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी, लिंफ नोड सुजणे, कोरडा खोकला, अंगावर रॅश येणे, न्यूमोनिया, मेंदूज्वरसदृश लक्षणे दिसून येतात. कीडा चावल्याच्या ठिकाणी व्रण दिसतो. रक्ताची चाचणी केल्यानंतरच रोगाचे निदान होते. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. पण साथीच्या वेळी डॉक्टरकडे जाणे आणि वेळेत औषधोपचार, अ‍ॅन्टीबायोटिक्स घेतल्याने या रोगापासून बचाव होतो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले. प्रतिबंध व उपचारझाडाझुडपात काम करताना पूर्ण बाह्यांचे पायघोळ कपडे वापरावेत. कपडे, अंथरुण पांघरुणावर कीटकनाशक औषधांचा वापर करावा. घरात आणि बाहेर स्वच्छता पाळावी. डोकेदुखी, मेंदूज्वर, मळमळ, सुस्ती येणे, चालताना तोल जाणे, ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर