शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

नागपुरात दहा वर्षात १८७ आगीच्या घटना : फटाक्यामुळे ४९ आगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:04 AM

दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या.

ठळक मुद्देफटाके फोडताना खबरदारी घेण्याचे मनपाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. परंतु यादरम्यान सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे २ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या आनंदाच्या क्षणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. विशेषत: फटाके उडविताना प्रत्येकाने सावधता बाळगावी, असे आवाहन अग्शिनमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.दिवाळीच्या कालावधीत फटक्यांमुळे आगीच्या घटना घडतात. यात दुर्घटनांचा समावेश असतो. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. फटाके उडविताना दाट वस्तीच्या ठिकाणी उडवू नये, रस्त्यावर फटाके उडविताना रस्ता निर्मनुष्य असल्याची खात्री करण्यात यावी. मोठ्या आवाजाचे फटाके उडवू नये, हातात धरून फटाके उडवू नये, फटाके उडविताना सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहनही अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधादिवाळी साजरी करताना अनपेक्षितपणे घडणाºया दुर्घटनांवर आळा आणण्यासाठी मनपा अग्निशमन विभाग तत्पर आहे. अनुचित घटनांप्रसंगी मदतीसाठी अग्निशमन पथक सज्ज असून आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन सेवेसाठी ०७१२-२५६७७७७,०७१२-२५६७१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनापातर्फे करण्यात आले आहे. दिवाळी सणाचा आनंद लहान थोरांच्या चेहऱ्यावर कायम राहावा यासाठी प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन विभागाची चमू अविरत कार्यरत आहे.प्रदूषण विरहीत दिवाळी साजरी करामागील दहा वर्षांमध्ये दिवाळीदरम्यान फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. दिवाळीदरम्यान दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. अशा घटनांवर निर्बंध यावे यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता प्रदूषण विरहीत फटाके उडवून दिवाळी साजरी करावी व दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा.अभिजित बांगर, आयुक्त महापालिकाफटाक्यामुळे घडलेल्या आगीच्या घटनावर्ष           घटना२००९         ५२०१०         ०२०११         ५२०१२         ९२०१३         ५२०१४        ४२०१५        ५२०१६        ६२०१७        ८२०१८         २एकूण ४९

टॅग्स :Diwaliदिवाळीfireआगnagpurनागपूर