हिंगणा/काटाेल/कन्हान : हिंगणा, काटाेल तालुक्यात व कन्हान (ता. पारशिवनी) परिसरात बुधवारी (दि. ३०) काेराेना टेस्ट करण्यात आल्या. त्यात हिंगणा तालुक्यात सहा, काटाेलमध्ये तीन तर कन्हान येथे एक नवीन रुग्ण आढळून आला आहे.
हिंगणा तालुक्यात ११६ नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली. त्यात सहा जण काेराेना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ३,८१३ झाली असून, यातील ३,६०० रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. शिवाय, ९२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये वानाडोंगरी व डिगडोह येथील प्रत्येकी दाेन तर रायपूर व गुमगाव प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
काटाेल तालुक्यात बुधवारी ९१ नागरिकांची काेराेना चाचणी करण्यात आली असून, यातील तिघांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यात एक जण काटाेल शहरातील तर दाेघे ग्रामीण भागातील आहेत. नव्याने आढळून आलेले रुग्ण हे काटाेल शहरातील सगमानगर तसेच तालुक्यातील खुर्सापार व जामगड येथील रहिवासी आहेत. कन्हान येथे बुधवारी ११ नागरिकांची टेस्ट करण्यात आली असून, यातील एक जण पाॅझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे या परिसरातील काेराेना रुग्णांची संख्या ८६७ झालील असून, ८३३ रुग्णांनी काेराेनावर मात केली तर २५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.