शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

आणखी सहा मृतदेह मिळाले

By admin | Published: July 11, 2017 1:21 AM

सेल्फीच्या नादात आठ तरुणांना नागपूर नजीकच्या वेणा जलाशयात जलसमाधी मिळाली.

वेणा जलाशयात आठ तरुणांना जलसमाधी सेल्फीचा मोह नडला १३ तास चालले आॅपरेशन सर्च एकाचा शोध सुरूचलोकमत न्यूज नेटवर्कधामणा (नागपूर) : सेल्फीच्या नादात आठ तरुणांना नागपूर नजीकच्या वेणा जलाशयात जलसमाधी मिळाली. त्यातील एकाचा मृतदेह रविवारी रात्री तर सहा तरुणांचे मृतदेह सोमवारी बचाव पथकाने पाण्याबाहेर काढले. एकाचा अद्यापही शोध लागलेला नाही. नागपूर नजीकच्या वेणा जलाशयात रविवारी सायंकाळी पिकनिक करण्यासाठी १० तरुण गेले होते. जलाशयातील नावेत बसल्यानंतर त्यांना सेल्फी काढण्याचा मोह झाला. हा मोहच या तरुणांना मृत्यूच्या दाढेत पोहोचवणारा ठरला. नाव पाण्यात बुडाली नावाड्यासह तिघांना पोहता येत असल्यामुळे ते बचावले. आठ जणांचा मात्र जलाशयात बुडून मृत्यू झाला.मृतांमध्ये राहुल जाधव (रा. नवीन सुभेदार, नागपूर), अंकित अरुण भोस्कर (२२, रा. हिंगणा), परेश काटोके (रा. नागपूर), रोशन खांदारे (रा. पेठ कालडोंगरी), अक्षय मोहन खांदारे (रा. पेठ कालडोंगरी), अतुल भोयर (रा. हुडकेश्वर, नागपूर), पंकज डोईफोडे (रा. उदयनगर, नागपूर) आणि प्रतीक आमडे (रा. उदयनगर, नागपूर) या तरुणांचा समावेश आहे. नशीब बलवत्तर म्हणून अमोल मुरलीधर दोडके (२८, रा. दत्तात्रयनगर, नागपूर), रोशन मुरलीधर दोडके (रा. दत्तात्रयनगर, नागपूर) तसेच नावाडी अतुल ज्ञानेश्वर बावणे (२१, रा. पेठ कालडोंगरी) हे तिघे बचावले. राहुलचा मृतदेह रविवारी रात्री गवसला तर अंकित, परेश, रोशन, अक्षय व प्रतीक यांचे मृतदेह सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आणि पंकजचा मृतदेह सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पाण्याबाहेर काढण्यात आला. अतुलला शोधण्याचे कार्य सुरूच होते. रविवारी सुटी असल्याने हे सर्वजण वेणा जलाशय परिसरात पिकनिकला गेले होते. सर्वजण मौजमस्ती करण्याच्या मुडमध्ये असल्यामुळे त्यांना नावेत बसून जलविहार करण्याचा मोह अनावर झाला.त्यानुसार सर्व जण एकाच नावेत बसून जलाशयात निघाले. नावेत अतिरिक्त वजन झाल्याने त्यातच सेल्फी काढण्यासाठी त्यांनी इकडे - तिकडे हालचाली केल्यामुळे ही नाव डगमगली आणि काही कळायच्या आतच नावेतील सर्वच्या सर्व पाण्यात बुडाले. माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांसह महसूल विभागातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लगेच स्थानिक मासेमाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. दरम्यान, पोहणे येत असल्यामुळे अमोल दोडके, रोशन दोडके व अतुल बावणे पाण्याबाहेर आले. तर काही वेळेनंतर राहुलचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. अंधार वाढल्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी ७.३० वाजतापासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. सकाळी ८.२० वाजताच्या सुमारास अंकितचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाने बाहेर काढला. त्यानंतर रोशन, परेश, अक्षय व प्रतीकचा मृतदेह आढळला. अतुल भोयरला शोधण्याचे कार्य सायंकाळपर्यंत सुरूच होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास उलटलेली नाव शोधून काढण्यात आली. सातही जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लगेच कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह महसूल व पाटबंधारे भागातील अधिकारी दिवसभर घटनास्थळी तळ ठोकून होते. मृतांच्या आप्तस्वकीयांसह नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, नगरसेवक अभय गोटेकर, विलास करांगळे यांनीही घटनास्थळाला भेट दिली.एसडीआरएफ पथकाची गैरसोयबुडालेल्या तरुणांना शोधण्यासाठी एसडीआरएफ (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड)च्या नागपूर येथील पथकाला बोलावण्यात आले होते. शिवाय, जगदीश खरे यांचीही विशेष मदत घेण्यात आली. बचाव पथक व जगदीश खरे सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी या पथकातील सदस्यांना साधा नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय करून देण्यात आली नाही. प्रशासनाची तत्परता, नौदल कमांडरची घेतली मदत रविवारी सायंकाळची घटना. परंतु ती जवळपास ८.३० वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती होताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवित गतीने पावले उचलली. प्रशासनाच्या निर्देशानुसार एसडीओ, तहसीलदार हे घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे त्यांच्याकडून मिनिट-टू-मिनिट माहिती घेत होते आणि आवश्यक ते निर्देश देत होते. रात्र असल्याने शोध कार्यात अडचणी आल्या.८ पैकी केवळ एकाचाच मृतदेह काढता आला. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. एसडीओ व तहसीलदारांसह अधिकारी उशिरापर्यंत घटनास्थळी होते. बुडलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात आली. नौदल कमांडर नायर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ते कामठीला होते. त्यांना विनंती करण्यात आली. त्यांना तातडीने घटनास्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात आली. नौदल कमांडर नायर यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू झाले. तीन तरुणांना वाचवता आले. तसेच ज्या तरुणांचा मृतदेह बाहेर निघाला, त्यांना तातडीने कळमेश्वर येथील रुग्णालयात पाठवून त्याचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांना मृतदेह स्वाधीन करण्यात आला.तेथेही धावून गेले जगदीश खरेजगदीश खरे हे नाव नागपूरकरांसाठी नवीन नाही. गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्यांचे मृतदेह काढणारी एकमेव व्यक्ती म्हणजे जगदीश. त्यांनी आजवर अनेकांचे जीवही वाचविले आहे. वेणा नदीतील घटनेनंतर जगदीश खरेंशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी ते तिथेही धावून गेले. पालकमंत्र्यांनी दिली भेटघटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दुपारी घटनास्थळाला भेट देत बचाव पथकाद्वारे सुरू असलेल्या शोधकार्याचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अतुल व पंकजला शोधण्यात स्थानिक बचाव पथकाना यश आले नाही तर पुणे येथून एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स)च्या पथकाला बोलावण्यात येईल. तशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. घटनास्थळी आ. डॉ. आशिष देशमुख, आ. प्रकाश गजभिये, सलील देशमुख, नाना गावंडे आदींनी भेट दिली. अक्षय हा एकुलता एक मुलगामोहन खांदारे हे पेठ (कालडोंगरी)चे माजी सरपंच असून, अक्षय हा त्यांचा एकुलता एक मुलगा होय. अक्षयला काळाने हिरावून नेल्याने खांदारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोहन खांदारे यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. ते अजूनही माठ घडवून विकण्याचा व्यवसाय करीत असून, याच व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सख्खे भाऊ बचावलेवेणा जलाशय परिसरात मित्रांसह पिकनिकसाठी गेलेल्यांमध्ये अमोल मुरलीधर दोडके आणि रोशन मुरलीधर दोडके या दोन सख्ख्या भावांचाही समावेश होता. जलाशयातील नावेमध्ये ते दोघेही बसले होते. जलाशयात ती नाव बुडाली. मात्र या दोन्ही भावांना पोहणे येत असल्याने ते कसेबसे पाण्याबाहेर निघाले. मित्रांना जलसमाधी मिळाल्याने या दोन्ही भावांना जबर मानसिक धक्का बसला.