सहा नागपूरकर हायकोर्ट न्यायमूर्तींचा उद्या सत्कार
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: February 22, 2023 01:50 PM2023-02-22T13:50:13+5:302023-02-22T13:50:53+5:30
सत्र न्यायालयातील सभागृहात दुपारी ४.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर : जिल्हा वकील संघटनेच्या वतीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठामधील सहा नागपूरकर न्यायमूर्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा व सत्र न्यायालयातील सभागृहात दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सत्कारमूर्ती न्यायमूर्तींमध्ये न्या. अविनाश घरोटे, न्या. अनिल किलोर, न्या. मुकुलिका जवळकर, न्या. अनिल पानसरे, न्या. यानशिवराज खोब्रागडे व न्या. वृषाली जोशी यांचा समावेश आहे. कार्यक्रमात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल व जिल्हा न्यायाधीश एम. एस. आझमी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे व महासचिव ॲड. मनीष रणदिवे यांनी ही माहिती दिली.