लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली आहे.नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेसमध्ये नेहमीच वेटिंगची स्थिती पाहावयास मिळते. दिवाळीच्या काळात हे वेटिंग आणखीनच वाढले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ०२०३२ नागपूर-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून शुक्रवार ९, १६ आणि २३ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता सोडण्यात येईल. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी ५.१० वाजता पोहोचेल.रेल्वेगाडी क्रमांक ०२०३१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून गुरुवारी ८, ११ आणि २२ नोव्हेंबरला रात्री ११.३५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, दादर येथे थांबा देण्यात आला आहे.दोन्ही गाड्यात एकूण १२ कोच असून त्यात एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, चार स्लिपर आणि पाच साधारण द्वितीय कोच राहतील. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवाशांसाठी आरक्षण केंद्रावर उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
नागपूर-मुंबई-नागपूर सहा विशेष रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:15 AM
दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधाअतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाचा निर्णय