लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमण विभागाच्या पथकांनी गुरुवारी शहरातील विविध भागातील सहा अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविली. महापालिके च्या पथकाने मंगळवारी झोन क्षेत्रातील छावणी, टेलर लाईन येथील धार्मिक स्थळ हटविले. त्यानंतर खलासी लाईन, पी.के.साळवे मार्गावरील शक्ती नाल्याच्या काठावरील धार्मिक स्थळ तोडण्यासाठी पथक पोहचताच आजूबाजूच्या वस्तीतील नागरिक गोळा झाले. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलीस बंदोबस्त असल्याने कारवाई पार पडली. दुसऱ्या पथकाने धंतोली भागातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविले. नासुप्रच्या पथकाने उत्तर नागपुरातील नागमंदिर आणि गणपती मंदिर(ठक्करग्राम शाळेजवळील) येथील अतिक्रमण काढले. यावेळी स्थानिक नागरिकांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत व्यवस्थितपणे या ठिकाणचे अतिक्रमण काढले.कार्यकारी अभियंता विभागीय अधिकारी(उत्तर) अनिल राठोड, कनिष्ट अभियंता, सुधीर राठोड नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील व पांचपावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांच्या नेतृत्वात ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.
नागपुरातील सहा अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:13 AM
महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमण विभागाच्या पथकांनी गुरुवारी शहरातील विविध भागातील सहा अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविली.
ठळक मुद्देमहापालिका व नासुप्रच्या अतिक्रमण विभाग पथकांची कारवाई