लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन)आयोजित आणि रायसोनी समूहातर्फेपुरस्कृत १९ वा वार्षिक क्र ीडा पुरस्कार वितरण सोहळा यंदा ५ (रविवार) नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता माजी आॅल इंग्लंड बॅडमिंटन विजेते प्रकाश पदुकोण यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित करण्यात येत आहे.रामदासपेठस्थित हॉटेल सेंटर पॉर्इंंटमध्ये होणाºया या सोहळ्यात क्र ीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल विदर्भाचा रणजी क्रि केटपटू ललित यादव, भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार मोना मेश्राम, युवा बुद्धिबळपटू रौनक साधवानी, आंतरराष्टÑीय बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक डॉ.बबनराव तायवाडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.एसजेएएनचे अध्यक्ष किशोर बागडे यांनी पत्रपरिषदेत विजेत्यांची नावे जाहीर केली. नीलेश देशपांडे, नरेंद्र चोरे, अमित रामटेके, संदीप दाभेकर यांच्या समितीने पुरस्कारार्थी निवडले. वर्षभरात शालेयस्तरावर उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल वर्धमाननगर येथील स्वामीनारायण स्कूलला उत्कृष्ट शाळेचा तसेच महाविद्यालयीनस्तरावर यशस्वी कामगिरी केल्याबद्दल आर. एस. मुंडले धरमपेठ आर्टस् अॅन्ड कॉमर्स कॉलेज संघाचा गौरव करण्यात येईल.सिनियर पुरुष गटात विदर्भ क्रि केट संघाचे प्रतिनिधित्व करणारा वेगवान गोलंदाज ललित यादव याला पुरस्कृत करण्यात येईल. ललितने गतवर्षी २१.२९ च्या सरासरीने ३० गडी बाद केले.सिनियर गटात पुरस्काराची मानकरी असलेली मोना मेश्राम हिने इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. बीसीसीआयतर्फे देण्यात येणाºया एम. ए. चिदंबरम पुरस्काराची मानकरी ठरली होती. बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामिगरी करणारा रौनक साधवानीने द.कोरियातील आशियाई युथ बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. नवी दिल्लीतील कॉमनवेल्थ बुद्धिबळ स्पर्धेत तो १० वर्षे गटाचा सुवर्णविजेता होता. रौनकला ज्युनियर मुलांच्या गटात तसेचकराड येथे आयोजित राज्य ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत विजेती ठरलेली मालविका बन्सोड हिला ज्युनियर मुलींच्या गटाचा पुरस्कार प्रदान करण्यात येईलधनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी विविध क्र ीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केले. खेळाच्या पायाभूत सुविधांची उभारणी करीत क्र ीडाक्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांना उत्कृष्ट क्रीडा संघटक हा पुरस्कार दिला जाईल.पुरस्कार वितरण समारंभाला रायसोनी ग्रुपचे चेअरमन सुनील रायसोनी, आ.समीर मेघे, बैद्यनाथचे सहव्यवस्थापक संचालक सुरेश शर्मा, बँक आॅफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक आनंद कोठीवान उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेला रायसोनी स्पोर्टस् अॅन्ड कल्चरल अकॅडमीच्या संचालक मृणाल नाईक आणि जनसंपर्क अधिकारी अमित गंधारे उपस्थित होते.
ललित, मोना, रौनक, मालविका, तायवाडे यांना एसजेएएन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:03 AM
स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन)आयोजित आणि रायसोनी समूहातर्फेपुरस्कृत १९ वा वार्षिक क्र ीडा पुरस्कार वितरण सोहळा यंदा ५ (रविवार) नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता माजी आॅल इंग्लंड बॅडमिंटन विजेते प्रकाश पदुकोण यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित करण्यात येत आहे.
ठळक मुद्देप्रकाश पदुकोण मुख्य अतिथी : ५ नोव्हेंबर रोजी वितरण सोहळा