लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांतून मजुरांचे लोंढे महामार्गाने चालत असल्याचे चित्र अद्यापही दिसून येत आहे. हजारो किलोमीटरची पायपीट करत असताना मजुरांच्या पायातील चपला-जोडे अक्षरश: फाटले आहेत. अनेक जण नाईलाजाने भर उन्हात अनवाणी पायाने चालत आहेत. पांजरी येथील टोलप्लाझाजवळ हे मजूर विश्रांतीसाठी थांबत असताना त्याची ही दयनीय अवस्था लक्षात येत आहे. अशा स्थितीत त्यांच्या पायांना चपलांचा आधार देण्यासाठी स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला असून चपला-जोडे देण्यात येत आहेत.नागपूरजवळील पांजरी येथील टोलनाक्यापासून राज्याच्या सीमेपर्यंत ट्रकमधून जाणे शक्य असल्याची बाब कळाल्यानंतर ते त्या दिशेने चालत आहेत. संबंधित टोलनाक्यांवर दररोज हजारो मजूर पोहोचत आहेत. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर अनेकांच्या चपला फाटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. भर उन्हाळ्यात अनवाणी पायांनी चालण्याची त्यांच्यावर वेळ येत असल्याने स्थानिक संघ स्वयंसेवक व गावच्या नागरिकांकडून मदत करण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून चपला-जोडे जमा करण्यात आले. शिवाय काही निधी एकत्रित करून परिसरातील काही दुकाने व गोडाऊनमधून नवीन चपला-जोडे मागविण्यात आले. त्यांचे गरजू मजुरांना वाटप करण्यात येत आहे.
अनवाणी पायांना चपलांचा आधार : आऊटर रिंग रोडवर सेवाकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 1:55 AM
हजारो किलोमीटरची पायपीट करत असताना मजुरांच्या पायातील चपला-जोडे अक्षरश: फाटले आहेत. अनेक जण नाईलाजाने भर उन्हात अनवाणी पायाने चालत आहेत. पांजरी येथील टोलप्लाझाजवळ हे मजूर विश्रांतीसाठी थांबत असताना त्याची ही दयनीय अवस्था लक्षात येत आहे. अशा स्थितीत त्यांच्या पायांना चपलांचा आधार देण्यासाठी स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला असून चपला-जोडे देण्यात येत आहेत.
ठळक मुद्देमजुरांची पायपीट सुरूच