लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील लघु उद्योगाचा विकास व्हावा, अशी हूरहूर सर्वांच्या मनात असली पाहिजे. या उद्योगाचे स्वरुपच बदलले पाहिजे. लघु उद्योगाचा विकास होऊन तो देशविकासाचा पाया बनावा, असे मत केंद्रीय सांस्कृतिक आणि जड उद्योग राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी येथे व्यक्त केले.लघु उद्योग भारतीचा तीन दिवसीय अखिल भारतीय रौप्य महोत्सवी कार्यक्रम रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी उद्यमी संमेलनात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर उद्योजक असोसिएट्स कॅप्सुल लि.चे चेअरमन डॉ. अजित सिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र गुप्ता, राष्ट्रीय सचिव गोविंद लेले, महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र वैद्य आणि सुधीर दाते उपस्थित होते.मेघवाल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न आहे. त्यासोबत देशाचा आर्थिक विकास दर कायम ठेवायचा आहे. त्याकरिता प्रत्येक गाव निर्यातदार बनावे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात लघु उद्योग भारतीची शाखा असावी. विकासाच्या प्रक्रियेत बँकांच्या समस्यांचे समाधान व्हावे. बँकांनी लघु उद्योजकांना एकाच काठीने हाणू नये. चांगली स्थिती नसलेल्या उद्योगांना मदत करावी. सन २०२२ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था सक्षम होणार आहे. त्यात लघु उद्योगांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आॅटोमोबाईल क्षेत्रात मंदी आहे. डीलर बँकेकडे जातो, पण त्याला भाव मिळत नाही. लघु उद्योगाला क्रेडिट मिळत नाही, शिवाय पुरवठा केलेल्या वस्तूंचा पैसाही वेळेत मिळत नाही. या दोन्ही गोष्टीत सरकारला मध्यस्थी करण्याची गरज आहे. लघु उद्योग मजबूत बनण्यासाठी त्यांना येणाºया समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्र्यापर्यंत बाजू मांडू. प्लास्टिक बंद होणार, पण या उद्योगासाठी काय केले पाहिजे, यावरही विचार करणार आहे. लघु उद्योगासाठी एक खिडकी योजना असावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जीएसटी तंत्रज्ञानाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.संचालन गोविंद लेले यांनी केले तर डॉ. कृष्ण गोपाल यांनी आभार मानले. यावेळी लघु उद्योग भारतीचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लघु उद्योग देशविकासाचा पाया बनावा: अर्जुनराम मेघवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 1:19 AM
देशातील लघु उद्योगाचा विकास व्हावा, अशी हूरहूर सर्वांच्या मनात असली पाहिजे. या उद्योगाचे स्वरुपच बदलले पाहिजे. लघु उद्योगाचा विकास होऊन तो देशविकासाचा पाया बनावा, असे मत केंद्रीय सांस्कृतिक आणि जड उद्योग राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी येथे व्यक्त केले.
ठळक मुद्देलघु उद्योग भारतीचे उद्यमी संमेलन