शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

स्मार्ट कार्ड, वर्षभरातच खराब

By admin | Published: May 16, 2016 3:16 AM

प्रादेशिक परिवहन विभागातून कायमस्वरूपी वाहन परवान्यासाठी आधी ९० रुपये शुल्क आकारले जात होते.

आरटीओ : वाहनधारकांना पडतो भुर्दंडनागपूर : प्रादेशिक परिवहन विभागातून कायमस्वरूपी वाहन परवान्यासाठी आधी ९० रुपये शुल्क आकारले जात होते. ‘स्मार्ट कार्ड’ योजना लागू झाल्यापासून वाहनधारकाला ३१३ रुपये मोजावे लागत आहेत. मात्र वर्षभरातच हे कार्ड खराब होऊन डुप्लिकेट कार्डसाठी पुन्हा एवढेच शुल्क भरण्याचीे वेळ येत असल्याने वाहनधारकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.दलालांना फाटा देण्यासाठी व कामाला गती येण्यासाठी आरटीओ कार्यालयाने आॅक्टोबर २००६ पासून ही योजना सुरू केली. शिकाऊ व पक्का वाहन परवाना तयार करण्याचे काम हैदराबादच्या युनायटेड टेलिकॉम कंपनीला देण्यात आले. कायम परवान्यासाठी लागणाऱ्या ३१३ रुपये शुल्कामधून १६२ रुपये ७० पैसे आरटीओला मिळतात. उर्वरित रक्कमेतून ५० रुपये टपाल खात्याला तर शिल्लक रक्कम या कंपनीला मिळते. सुरुवातीची काही वर्षे या कंपनीने चांगले कार्ड दिले, परंतु गेल्या काही वर्षांपासून कार्डाचा दर्जा खालवला असून वर्षभरातच कार्ड खराब होत असल्याच्या तक्रारी आहेत. यात कार्डवरील ‘प्लास्टीक कव्हर’ निघणे, फोटो व नाव पुसट होणे, कार्डातील चिप खराब होणे आदी तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, परवाना खराब झाल्याच्या कारणावरून काही वाहतूक पोलीस आर्थिक दंड वसूल करीत असल्याच्याही तक्रारी आहेत. खराब कार्ड बदलविण्यासाठी आरटीओच्या युटीएल विभागाकडे तक्रार केल्यावर त्यांच्याकडून डुप्लिकेट अर्ज करण्याची सूचना केली जाते. यामुळे परत अर्ज भरा, शुल्कासाठी रांगेत लागा आणि नंतर कार्ड मिळण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ येते. वर्षभरात कार्ड खराब होत असेल तर त्याचे शुल्क आकारू नये, अशी मागणीही वाहनधारकांकडून होत आहे.(प्रतिनिधी)कार्डला लॅमिनेशन करू नयेवाहन परवानाच्या स्मार्ट कार्डला लॅमिनेशन करू नये. यामुळे परवाना लवकर खराब होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्या जागी कागदाचे पॅकेट वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, प्रत्येक परवान्यासोबत संबंधित कंपनी कागदाचे पॅकेट देते, परंतु पोस्ट खाते या पॅकेटमध्ये परवाना टाकण्यास टाळाटाळ करते. यामुळे विना पॅकेट वाहनचालकांना परवाना मिळतो.