लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहर पोलिसांसाठी कमांड अॅन्ड कंट्रोल सेंटर (सीसीसी) इमारतीचे व नागपूर शहरातील हरित क्षेत्र प्रकल्पाचे ई-भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील वर्षा निवासस्थानी होणार आहे. नागपुरातील प्रकल्पाचा शुभारंभ राजे रघुजी भोसले सभागृह नगर भवन महाल येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व वेबकास्टद्वारे करण्यात येणार आहे. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित राहतील. महापौरांनी स्थानिक मंत्री, आमदार, खासदार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. केंद्र शासनद्वारा अमृत अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांत पाणीपुरवठा, मलनि:सारण व हरित क्षेत्र प्रकल्प सुरू होत आहेत. तसेच स्मार्ट सिटी अभियानातील काही प्रकल्पांचाही ई-शुभांरभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात कमांड अॅन्ड कंट्रोल सेंटर उभाण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयासाठी तयार करण्यात येणाऱ्या या केंद्रामुळे गुन्ह्यांचा तात्काळ तपास करणे व गुन्हेगारी नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:50 AM