शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विद्यापीठात ‘स्मार्ट क्लासरुम’

By admin | Published: February 02, 2016 2:57 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये वर्गांना विद्यार्थी उपस्थित नसतात व विभागप्रमुखांना याची माहितीच नसते, ...

जनसंवाद विभागातील वर्गखोल्यांमध्ये लागले ‘सीसीटीव्ही’ : विभागप्रमुखांचा राहणार ‘वॉच’योगेश पांडे नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये वर्गांना विद्यार्थी उपस्थित नसतात व विभागप्रमुखांना याची माहितीच नसते, अशी ओरड होत असते. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने ‘स्मार्ट क्लासरुम’कडे एक पाऊल पुढे टाकले असून आता विभागप्रमुखांना थेट कक्षातूनच विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात ठिकठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले असून यात वर्गखोल्यांचादेखील समावेश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हालचालींसोबतच, त्यांच्या सुरक्षेकडेदेखील एका ‘क्लिक’द्वारे लक्ष ठेवता येणार आहे.नागपूर विद्यापीठात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आमूलाग्र बदल दिसून येत आहेत. परीक्षा प्रणालीप्रमाणेच विभागदेखील ‘आॅनलाईन’ व्हावेत असा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा आग्रह आहे. विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे मिळालेला ‘अ’ दर्जा लक्षात घेता विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’ तसेच इतर पदव्युत्तर विभागांत ‘स्मार्ट क्लासरूम’ उभारण्यासाठीदेखील मागील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. अखेर जनसंवाद विभागापासून याची सुरुवात करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच जनसंवाद विभागात अत्याधुनिक असे १६ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यात आले आहेत. विभागातील वर्गखोल्या, कार्यालय, संगणक कक्ष, स्टुडियो, एडिटिंग रुम, प्रवेशद्वार यांच्यासह विभागप्रमुखांच्या कक्षाचादेखील समावेश आहे. सुरक्षेसाठी होणार मदतविद्यापीठाच्या ‘कॅम्पस’ची भौगोलिक रचना लक्षात घेतली तर जनसंवाद विभाग हा कोपऱ्यात असून याच्या परिसरात बाहेरील व्यक्तीने प्रवेश करणे सहज शक्य आहे. प्रसारमाध्यमांच्या कार्यप्रणालीचे शिक्षण देणाऱ्या या विभागातील ‘स्टुडिओ’मध्ये महागडे कॅमेरे, अत्याधुनिक एडिटिंग मशीन तसेच संगणकांचा समावेश आहे. या महागड्या उपकरणांच्या सुरक्षेसाठीदेखील ‘सीसीटीव्ही’ची मदत होणार आहे. शिवाय विद्यार्थिनींची सुरक्षा लक्षात घेता विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यामुळे अभ्यागतांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे, असे मत विभागप्रमुख डॉ.धर्मेश धवनकर यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांमध्ये शिस्त वाढेलविद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमधील वर्गखोल्या अनेकदा रिकाम्याच दिसतात. कधी विद्यार्थीच नसतात, तर कधी प्राध्यापक वर्गच घेत नाही. जनसंवाद विभागात नियमित वर्ग होत असले तरी विद्यार्थ्यांची पूर्ण उपस्थिती नसते. शिवाय अनेक विद्यार्थी एका वर्गानंतर चालले जातात. ‘सीसीटीव्ही’मुळे आता विभागप्रमुखांचे थेट वर्गखोल्यांवर लक्ष राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये याचा धाक राहील व त्यांच्यामधील शिस्त वाढण्यात मदतदेखील मिळेल शिक्षणप्रणालीत काळानुरूप बदल होणे आवश्यकच आहे व ‘कॅम्पस’ला अत्याधुनिक स्वरूप देणे तसेच ‘स्मार्ट क्लासरुम’ या बाबीदेखील त्यात येतात. ‘रुसा’च्या माध्यमातून शासनाकडून लवकरच अनुदान मिळण्याची चिन्हे आहेत. या अनुदानातून ज्या विभागांनी प्रस्ताव सादर केले आहेत, तेथे ‘स्मार्ट क्लासरुम’, ‘रिसर्च लॅब’ उभारण्यावर प्रशासनाचा भर राहील, अशी माहिती कुलसचिव पूरण मेश्राम यांनी दिली.