नागपूर : शहरात पाच केंद्रे व १९३ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली होती. गेल्या चार दशकात शहराची लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १३ केंद्रांची व ८२२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु अधिकृ त पाच केंद्रे असताना आठ केंद्रे सुरू आहेत. या विभागात २६५ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून १४६ पदे रिक्त आहेत. आजच्या लोकसंख्येचा विचार करता विभागात ५५७ कर्मचारी कमी आहेत. नागरिकांनाही द्यावे प्रशिक्षण बांधकामासाठी मनपा प्रशासनाकडून नकाशा मंजूर केल्यानंतर त्याला अग्निशमन विभागाच्या मंजुरीची गरज असते. इमारतीत आग नियंत्रणात आणणारी यंत्रणा, बांधकाम करताना नियमानुसार सोडावयाची खाली जागा याचे निरीक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी करायला हवे. उपकरणे असली तरी आग लागताच ती आटोक्यात आणण्यासाठी उपकरणे चालविण्याचे नागरिकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. चांगल्या वाहनांची गरजआगीची घटना घडल्यास तात्काळ मदतीसाठी विभागाच्या १०१ क्रमांकाच्या टेलिफोनवर संपर्क साधला जातो. परंतु, आग आटोक्यात आणणाऱ्या गाड्यांची अवस्था चांगली नसल्याने विभागाचे पथक वेळेवर पोहचतीलच याची शाश्वती नसते. शहराचा विस्तार विचारात घेता ५० फायर टेंडरची गरज आहे. परंतु विभागाकडे जेमतेम २३ गाड्या वापरात आहेत. हायड्रोलिक प्लॅटफॉर्मची गरजअग्निशमन विभागाकडे उपलब्ध असलेल्या हायड्रोलिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उंच इमारतीतील आग आटोक्यात आणताना अडचणी येतात. ३५ मीटरपर्यंत उंचीच्या इमारतीतील आग आटोक्यात आणता येईल अशा हायड्रोलिक प्लॅटफॉर्म तसेच टर्न टेबल लॅन्डर (टीटीएल) ची गरज आहे. त्यातच २४ मीटरहून अधिक उंचीवरील इमारतीतील आग आटोक्यात आणणारी अत्याधुनिक यंत्रणा विभागाकडे नाही. त्यामुळे भविष्यात एखाद्या उंच इमारतीत आग लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अग्निशमन केंद्र वाढायला हवीत आग विझविण्याची यंत्रणा हवी स्मार्ट
By admin | Published: October 18, 2015 3:25 AM