शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विद्रुप चौकांना हवा स्मार्ट लूक

By admin | Published: October 19, 2015 2:38 AM

शहरातील चौक हे त्या शहराची ओळख निर्माण करणारे असतात. मुख्य चौकांमुळे शहराचा रुबाब लक्षात येतो.

चौकांना अतिक्रमणाचा विळखा : बॅनर, पोस्टर्सही हटविणे आवश्यक नागपूर : शहरातील चौक हे त्या शहराची ओळख निर्माण करणारे असतात. मुख्य चौकांमुळे शहराचा रुबाब लक्षात येतो. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी चौक हेच मार्गदर्शक असतात. म्हणूनच की काय चौकातील वाहतूक व्यवस्था, सौंदर्यीकरण, मार्गांची माहिती दर्शनीय भागात दिसेल असे फलक, पुतळ््यांची स्थिती आणि तेथील दृष्यबाबी त्यावर प्रभाव पाडत असतात .मात्र उपराजधानीतील चौक यातील कोणतेही गुणनिकष पूर्ण करताना दिसत नाही. अनेक चौकात ट्रॅफिक सिग्नलचा बोजवारा आहे. बोटावर मोजण्याइतके चौक सोडले तर इतर चौकात हिरवळीचा लवलेश नाही. वाहतूक नियमावली दर्शविणारे चिन्ह चौकातून गायब आहेत, पुतळे अडगळीत पडले आहेत व चौकात रस्त्यांची माहिती दर्शविणारे फलक आढळत नाही. मात्र जाहिरातींच्या फलकांनी चौकांचे विद्रुपीकरण झालेले दिसते. चौकांचे असेच विद्रुपीकरण सुरू राहिले तर या शहराला स्मार्ट लूक कसा येणार, यावर विचार करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)रस्त्यांची माहिती कशी मिळावीचौकातील अमुक रस्ता कुठे जातो, याबाबत माहिती मिळेल असे फलक दर्शनी भागात असणे गरजेचे आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना ही गोष्ट अत्यंत लाभदायक ठरते. कित्येकदा सीताबर्डी चौकातून रेल्वे स्टेशनचा रस्ता विचारणारे अनेकजण आपल्याला सहज मिळतात. बसस्टॅँड, रेल्वेस्टेशनजवळ शहरातील मुख्य ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांची माहिती मिळाली, तर बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही, किंवा त्यांची फसवणूक होणार नाही. असावे स्मार्ट थांबेचौकाच्या थोड्या अंतरावर संबधित मार्गाने जाणाऱ्यांसाठी आॅटो थांबा असावा. प्रवासी शोधण्यासाठी चौकात सैरभैर फिरणाऱ्या आॅटोंवर कडक कारवाईची व्यवस्थाच केली असावी. दुसरीकडे शक्य असल्यास जड वाहने, कार आणि दुचाकींसाठी विशिष्ट जागी उभे राहण्याची नियमावली असावी. जेणेकरून गोंधळ उडणार नाही .चौकांसाठी जेमतेम दीड कोटी चौकांना स्मार्ट करण्यासाठी प्रशासनाकडे नियोजनबद्ध विकासाची योजना व तशी इच्छाशक्ती हवी. यासोबतच या नियोजनाला आर्थिक बळ मिळणे तेवढेच आवश्यक आहे. नियमानुसार रस्त्यांच्या मेंटेनन्ससाठी मिळणाऱ्या निधीच्या १० टक्के निधी हा चौकाच्या सौंदर्यीकरणावर ठेवला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी मनपाच्या बजेटमध्ये चौकांसाठी तीन कोटी रुपये ठेवण्यात आले होते.चौक केवळ नावाचेच !विद्रुप चौकांना हवे स्मार्ट लूक : महापालिकेसह नागरिकांचाही हवा पुढाकारनागपूर : शहरात महापालिकेच्या यादीनुसार १४८ चौक आहेत. यामध्ये सहकारनगर, खामला, भेंडे ले-आऊट खामला, संघर्षनगर रिंग रोड वाठोडा, मेयो रुग्णालय चौक आणि गरीब नवाबनगर, रिंग रोड या पाच नवीन चौकांची भर पडली आहे. १४८ पैकी केवळ आठ चौक असे आहेत, जेथे चौकाच्या मधोमध गोलाकार हिरवळ (रोटरी आयलँड) अस्तित्वात आहे. यात रामनगर चौक, साळवे चौक, मेडिकल चौक, गोंडवाना चौक, लक्ष्मीनगर आठ रस्ता चौक, गांधी गेट चौक, महाल, मानस चौक आणि एसटी स्टॅँडच्या जाधव चौकाचा समावेश आहे. मात्र या आठही चौकात ट्रॅफिक सिग्नल अस्तित्वात नाही. पुतळा किंवा हिरवळीच्या रोटरीसोबत ट्रॅफिक सिग्नल असलेले केवळ चार चौक शहरात आहेत. ते म्हणजे गोळीबार चौक, तुकडोजी चौक, अग्रसेन चौक व दारोडकर चौक. मनपाच्या यादीत महापुरूषांचे पुतळे असलेल्या ५३ चौकांचा समावेश आहे. मात्र एकदोन सोडले तर बहुतेक पुतळे चौकांच्या कॉर्नरला अडगळीत पडले आहेत, ज्यावरील धूळही साफ होत नाही. हा एकप्रकारे त्या महापुरुषांचा अवमानच आहे. सीताबर्डी, राणी झांशी चौक, महाराष्ट्र बँक अशा मुख्य चौकमध्येही वाहतुकीचा गोंधळ पहायला मिळतो. पादचाऱ्यांसाठी आवश्यक झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे प्रत्येक चौकातून गायब आहेत, वाहतुकीचे नियम सांगणारे चिन्हांचे फलक किंवा रस्त्यांची माहिती दर्शविणारे फलक कुठेही आढळत नाहीत. याउलट जाहिरातींच्या फलकांनी अक्षरश: बाजार मांडलेला आहे. चौकात नियम नसल्याप्रमाणे आॅटोचालकांचे सैरभैर फिरणे सुरू असते. अनेक चौकात ट्रॅफिक सिग्नल नाहीत व अनेक ठिकाणी सिग्नल असूनही ते उपयोगाचे नाहीत. अशा चौकांना कोण स्मार्ट चौक म्हणेल?वाहतूक नियमांच्या आवश्यक बाबी असाव्यातशहरातील सर्व चौकांमध्ये वाहतूक नियमांचा गोषवारा दर्शविणाऱ्या सर्व आवश्यक बाबी असाव्या. पादचाऱ्यांना चालण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आणि चौकात थांबणाऱ्या वाहनांसाठीची स्टॉपेज पट्टी ठळकपणे दिसेल अशी पेंट केलेली असावी. चौकाच्या दृष्टीने आवश्यक असलेले नियम दर्शविणारे फलक दर्शनी भागात असणे गरजेचे आहे. मात्र खेदाची बाब म्हणजे नागपुरातील चौकात या बाबी दिसून येत नाही. झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या पूर्णपणे मिटल्या आहेत. एकाही चौकात वाहतूक नियम दर्शविणारे फलक नाहीत. हे सर्व नसल्याने चौकात शिस्त राहण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.पुतळ्यांकडेही द्यावे लक्ष चौकात असलेल्या पुतळ््यांचे सौंदर्यीकरण केल्यास त्या महापुरुषांचा सन्मान राखला जाईलच, मात्र यामुळे चौक परिसरालाही आकर्षक रूप दिल्या जाऊ शकेल. विधानभवनासमोरील बख्त बुलंदशाहांचा पुतळा, गांधीगेट, महाल येथील शिवाजी महाराज किंवा अग्रसेन चौकांना अशाच सौंदर्यीकरणामुळे आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र खेदाची बाब म्हणजे, असे काही ठिकाण सोडल्यास इतर सर्व चौकातील पुतळे अडगळीत पडले आहेत.त्यांची स्वच्छता केली जात नाही. चौकाच्या मधोमध हिरवळीची रोटरी करून पुतळ््यांना स्थान देण्याची बाब प्रशासनाच्या यादीत आहे, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. शहरातील आठ चौक वगळता कोणत्याही चौकात रोटरी नाही. त्यामुळे चौकांचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. याचबरोबर चौकापासून शहरातील मुख्य रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दा धूळखात पडला आहे. वर्धा रोड, अमरावती रोडवरील दुभाजकांवर केलेल्या सौंदर्यीकरणामुळे या रस्त्यांना आकर्षक रूप प्राप्त झाले आहे. सर्वच रस्ते आणि चौक असे आकर्षक झाल्यास शहराला खरोखर स्मार्ट झळाळी येईल हे निश्चित.(प्रतिनिधी)चौकात वाहतुकीचा गोंधळचौकात शिस्तीचा अभाव असल्याने नागपुरातील जवळपास सर्वच चौकात वाहतुकीचा गोंधळ उडाल्याचे चित्र पहायला मिळते. मुख्य चौकातील महत्त्वाची समस्या म्हणजे आॅटोचालकांचा हैदोस. सर्वच नियम धाब्यावर बसवून आॅटोचालक प्रवासी मिळविण्यासाठी सैरभैर फिरत असतात. यामुळे इतर वाहनचालकांचे लक्ष राहिले नाही तर अपघात होण्याची शक्यता निश्चित असते. यामुळे पादचाऱ्यांनाही त्रासाला सामोर जावे लागते. चौकात जड वाहने, कार आणि दुचाकी कशाही पद्धतीने उभ्या राहतात आणि सिग्नल सुटताच पळण्याची स्पर्धा सुरू होते. अशावेळी रुग्णवाहिकांनाही खोळंबावे लागते. वाहतुकीचा हा गोंधळ सोडविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जाहिरातींचा ओंगळवाणा बाजारनागपुरातील चौकांमध्ये जाहिरात फलकांचा बाजार किळसवाणा होत चालला आहे. राजकीय पुढारी, कंपन्या, दुकानांच्या जाहिरात फलकांनी चौक भरून आहेत. यामुळेच नियम फलक व रस्त्यांची माहिती देणारे आवश्यक फलक लावायलाच जागा उरली नाही. या जाहिरातबाजीवर प्रशासनाचेही नियंत्रण राहिले नसल्याने हा ओंगळवाणा प्रकार फोफावला आहे. यामुळे चौकांचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येते. चौकांना स्मार्ट स्वरूप द्यायचे असेल तर या विद्रुपीकरणाला आळा घालणे आवश्यक झाले आहे.