लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका व नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने रामदासपेठ, सेंट्रल बाजार रोड येथे चार चाकी वाहनांसाठी स्मार्ट पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना सुविधा झाली आहे. कोरोनामुळे काही महिन्यापासून हे काम थांबले होते.
मेट्रोमुळे शहराचा चेहरा बदलत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही वळण लागत असताना प्रदूषण विरहित सिटीचे प्रकल्पही राबविले जात आहेत. त्यात आता स्मार्ट पार्किंगची सोयही केली जात आहे. रामदासपेठ परिसरातील रुग्णालये आणि खासगी प्रतिष्ठानांची गर्दी विचारात घेता सेंट्रल बाजार रोडवरील चार चाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध झाल्याने सुविधा झाली आहे.
....
अशी असेल स्मार्ट पार्किंग
स्मार्ट पार्किंगसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे (गॅजेटस) लावण्यात आले आहे. सध्या ४० पार्किंग बे कार्यरत असून उर्वरित २९ पार्किंग बे ची दुरुस्तीनंतर ते सुध्दा ऑपरेशनमध्ये येईल. या व्यवस्थेव्दारे चार चाकी वाहनतळ डिजिटल कॅमेरा, बुम बॅरिअर, इलेक्ट्रॉनिक सेंसर, इतर गॅजेटसद्वारे ऑपरेट होतील.
...
ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था
चारचाकी वाहन धारकांसाठी ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था असेल. डिजिटल पेमेंट सेवा उपलब्ध नसलेल्या वाहन धारकांना रोख शुल्क भरण्याची सुध्दा व्यवस्था आहे. इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डच्या माध्यमातून स्मार्ट वाहन स्थळाच्या ठिकाणी पार्किंगसाठी उपलब्ध जागेची माहिती मिळणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी या पार्किंगची पाहणी केली. आयुक्त राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस, ई- गव्हर्नंस विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुमले आदींचे या प्रकल्पासाठी सहकार्य मिळाले.