स्मार्ट पार्किंगमुळे सेंट्रल बाजार राेडवर वाहनचालकांना व नागरिकांना मदत मिळेल, असा विश्वास महापाैरांनी व्यक्त केला. पार्किंग समस्या सुटेल. हे काम पूर्ण करण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा व वाहतूक पाेलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. येथे वाहनांच्या पार्किंगसाठी संगणकीय व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवस्थेचे संचालन वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे यांच्या माध्यमातून केली जात आहे.
अशी आहे व्यवस्था
स्मार्ट पार्किंगमध्ये इलेक्ट्राॅनिक्स उपकरणे लावण्यात आली आहेत. सध्या ४० पार्किंग वे कार्यरत आहेत. उर्वरित २९ च्या दुरुस्तीचे काम सुरू आहे व लवकरच तेही सेवेत उपलब्ध हाेतील. याद्वारे चारचाकी पार्किंगस्थळी डिजिटल कॅमेरा, बूम बॅरियर, इलेक्ट्राॅनिक्स सेन्सर व इतर गॅजेट्सने पूर्ण व्यवस्था संचालित हाेईल. ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था असेल. मात्र सध्या राेख देऊनच पार्किंग करावी लागणार आहे. इलेक्ट्राॅनिक्स डिस्प्ले बाेर्डाच्या माध्यमातून पार्किंगसाठी उपलब्ध जागेची माहिती मिळेल. स्मार्ट पार्किंगच्या देखभाल दुरुस्ती व संचालनासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.