लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरीब आणि होतकरूंना मिळालेल्या घरकूल योजनेमधील नागपूर ग्रामीणमधून आठ, शहरमधून पाच, शबरी घरकूल योजनेमध्ये एक, नागपूर शहरातील घरकूल पट्टेवाटप तीन आणि निर्वासितांसाठी घरकूल मालकी हक्क पट्टेवाटपमधून दोन अशी एकूण १९ लाभार्थ्यांशी बुधवारी ‘लोकसंवाद’ या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. घरकूल मिळाल्याच्या आनंदासोबतच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधता आल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.घरकुलामुळे मिळाला आधार : दर्शना सोलंकीनागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील खैरी (बिजेवाडा) येथील दर्शना अमरसिंग सोलंकी यांनी २०१७-१८ या वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाच्या रूपाने एक भक्कम आधार मिळाल्याचे सांगितले. दर्शना सोलंकी या विधवा महिला हातमजुरी करून घर चालवितात. एसईसीसी डाटामधून ग्रामसभेतून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांना घरकूल मंजूर झाले. नियमांनुसार त्यांना अनुदानाची १ लाख २० हजार रुपये रक्कम थेट बँक खात्यात मिळाली. ‘एमजीनरेगा’ अंतर्गत १६०० रुपये मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आले आणि त्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले.घराचे स्वप्न पूर्ण झाले : नवसी पवारभिवापूर तालुक्यातील शिवणगांव तांडा येथील नवसी पवार या महिलेला राहायला पक्के घर नव्हते. प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती गावातील ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांकडून मिळाली. ऑनलाईन अर्ज केला. आता घरकुलासोबतच उज्ज्वला गॅस योजना आणि शौचालयाचे अनुदानही थेट खात्यात जमा झाले. पक्के घर मिळाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.शासनाचा पारदर्शी कारभार : तायाबाई चौधरीकळमना येथील तायाबाई चौधरी यांना मातीच्या घरात राहताना खूप त्रास व्हायचा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे घर मिळाल्याचे सांगतात. घराचे बांधकाम करताना कोणतेही पैसे द्यावे लागले नाहीत. वेळावेळी त्यासाठीचा निधीचा धनादेश मिळत असल्यामुळे हे शासन पारदर्शी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार : यशोदाबाई आखरेजन्मापासून कच्च्या मातीच्या घरात राहात आहे. आता पंतप्रधान आवास योजनेतून सिमेंटचे पक्के घर मिळाले आहे. त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी असल्याची भावना अरोलीच्या लाभार्थी यशोदाबाई आखरे व्यक्त केली.स्वत:चे घर मिळाल्याचा आनंद : गिरिश जेसवानीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्हाला गेल्या महिन्यात त्या जागेची मालकी मिळाली. आता आम्हाला स्वत:च्या घरात राहात असल्याचा आनंद मिळत असल्याच्या भावना गिरीश जेसवानी यांनी व्यक्त केल्या.आम्ही भारताचे नागरिक : प्रकाश रामचंदानीसिंधी समाजबांधवांना गेल्या महिन्यात मालकीचे पट्टे मिळाले. आता भारताचे नागरिक असल्याचा आनंद मिळतोय, अशा भावना जरीपटका येथील रहिवाशी प्रकाश रामचंदानी यांनी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.मालकी पट्ट्यांची मागणी पूर्ण झाली : बुधाजी सुरकरसन २००० पासून धंतोली परिसरात राहणारे बुधाजी सुरकर यांनी मालकी पट्टे मिळावेत अशी वारंवार मागणी केली होती. मात्र ती मागणी डिसेंबर २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पूर्ण झाली आहे. मालकी पट्टे मिळाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लोकसंवाद कार्यक्रमात आभार मानले.यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, म्हाडाचे मुख्य अधिकारी संजय भिमनवार, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डी. एन. चव्हाण, प्रधानमंत्री आवास योजनेचे मकरंद नेटके, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, लीना बुधे उपस्थित होते.