शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

धुव्वाधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:57 AM

उकाड्याच्या आणि दुष्काळाच्या झळा सोसणाºया नागपुरात रुसलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार हजेरी लावली. रात्री ८.३० नंतर बरसलेल्या पावसाने तब्बल तीन तास नॉन स्टॉप बॅटिंग केल्याने उपराजधानी चिंब झाली.

ठळक मुद्देउपराजधानी भिजली; शेतकरी सुखावलाहवामान खात्याचा अंदाजही खरा ठरला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उकाड्याच्या आणि दुष्काळाच्या झळा सोसणाºया नागपुरात रुसलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार हजेरी लावली. रात्री ८.३० नंतर बरसलेल्या पावसाने तब्बल तीन तास नॉन स्टॉप बॅटिंग केल्याने उपराजधानी चिंब झाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी भरले होते. सर्व रस्ते जलमय झाले होते. तसेच बर्डी येथील लोखंडी पुलाखाली कंबरभर पाणी साचले होते. यातच मॉडेल मिल चाळीत पाणी शिरले होते. येथील राजेश खरे यांच्या घरात गुडघाभर पाणी भरले होते. धरमपेठ, शंकरनगर चौक, अलंकार टॉकीज चौक, रामदासपेठ, धंतोली, नंदनवन परिसरात जिकडे-तिकडे पाणीच पाणी असे चित्र दिसत होते. यामुळे रात्री उशिरा घरी जाणाºया नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. रात्री ११.३० वाजतापर्यंत तब्बल ७२.७ मिमी पावसाची नोंद झाली होती.रात्री उशिरापर्यंत या पावसाचा जोर कायम होता. शुक्रवारी दिवसाची सुरुवातच रिमझिम पावसाने झाली. मात्र दुपारी कडक उन तापले. यानंतर सायंकाळ होताच आकाशात पुन्हा काळ्या ढगांची गर्दी झाली आणि रात्री ८.३० वाजताच्या सुमारास धो-धो पावसाला सुरुवात झाली. यासोबतच हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाजही खरा ठरला. या पावसाने शेतकरी सुखावला. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. धानाची रोवणी रखडली होती. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या उत्तरेकडील पश्चिम बंगाल, बिहार, उत्तराखंड व उत्तर प्रदेशात धुवाँधार पाऊस सुरू आहे. त्यानुसार मध्य भारतातही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. यामुळे पुन्हा काही दिवस विदर्भात असेच वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विदर्भ पावसासाठी व्याकुळ झाला आहे. मागील काही दिवसांत पावसाचा प्रचंड बॅकलॉग वाढला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात केवळ ५२२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जेव्हा की, हा आकडा ७९८.८ मिमीपर्यंत पोहचणे आवश्यक होते. याचा तालुकानिहाय विचार करता नागपूर (शहर) मध्ये ४२०.८ मिमी पाऊस झाला असून, नागपूर (ग्रामीण) मध्ये ४३९.३ मिमी, कामठी ५५९.३ मिमी, हिंगणा ४०३.४ मिमी, रामटेक ३९२.९ मिमी, पारशिवनी ४०१.१ मिमी, मौदा ३७२.३ मिमी, काटोल ३२५.६ मिमी, नरखेड २३६.० मिमी, सावनेर ३०८.२ मिमी, कळमेश्वर ३४२.४ मिमी व उमरेड तालुक्यात ३७१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.