शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

एसएनडीएलची हद्दपारी निश्चित, महावितरण तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 11:08 AM

नागपूर शहरातील वीज वितरणाची जबबदारी सांभाळत असलेल्या एसएनडीएलचे जाणे आता निश्चित झाले आहे.

ठळक मुद्देदिवसभर बैठका, कुठल्याही क्षणी निर्णय फ्रेन्चाईजीचे कर्मचारी आणि व्हेंडर उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वीज वितरणाची जबबदारी सांभाळत असलेल्या एसएनडीएलचे जाणे आता निश्चित झाले आहे. महावितरणने अजूनपर्यंत तसा निर्णय घेतलेला नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर महावितरण कारभार आपल्या हाती घेणार की नाही, हे सांगता येत नाही. परंतु सूत्रानुसार मुंबईतून हिरवी झेंडी मिळाली असून कुठल्याही क्षणी महावितरण एसएनडीएलकडून जबाबदारी घेईल, असे सांगितले जाते. या दरम्यान एसएनडीएलचे कर्मचारी आणि व्हेंडर गुरुवारी दिवसभर थकीत वेतनाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते.एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने गेल्या १२ आॅगस्ट रोजी महावितरणला पत्र लिहून कामकाज सांभाळण्याबाबत असमर्थतादर्शविली होती. मधला मार्गही निघू शकला नाही. त्यामुळे महावितरणने कार्यभार सांभाळण्याची तयारी सुरू केली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा एसएनडीएल जाण्याची वेळ आली असल्याची पुष्टी करीत आहेत. बुधवारी कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर आज गुरुवारी एसएनडीएलचे कर्मचारी व व्हेंडर महावितरणच्या काटोल रोड येथील कार्यालयावर धडकले. पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. यादरम्यान महावितरणचे प्रभारी संचालक दिलीप घुगल आणि एसएनडीएलचे बिजनेस हेड सोनल खुराना यांनी व्हेंडर व कर्मचाऱ्यांशी वेगवेगळी भेट घेऊन चर्चा केली. एस्सेल युटिलीटीचे अध्यक्ष कमल माहेश्वरी यांच्यासोबतही त्यांचे बोलणे करून देण्यात आले. माहेश्वर यांनी व्हेंडर्सना त्यांची थकीत रक्कम देण्याचे आश्वासन देत मुंबईला बोलावले. परंतु व्हेंडर यांचे समाधान झाले नाही. घुगल यांनी कर्मचाऱ्यांना काम करीत राहण्याचे आवाहन करीत त्यांना भविष्याबाबत चिंता करू नका, असे सांगितले.

बिल प्रिंटींग रोखलेमहावितरणने एसएनडीएलला ई-मेल पाठवून त्यांना बिल प्रिंट करून वितरण करण्यास मनाई केली आहे. विशेष म्हणजे ७ सप्टेंबरपासून बिल वाटणे सुरु होणार होते. सध्या बिलांवर एसएनडीएलचे नाव आहे. अशा परिस्थितीत कार्यभार सांभाळण्याची वेळ आली तर बिल महावितरण वाटू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर बिल वितरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

व्हेंडर आजपासून संपावरएसएनडीएलचे विविध काम करणाºया व्हेंडर्सनी गुरुवारी सायंकाळी पत्रपरिषद घेऊन ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपासून काम बंद करण्याचे जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी वीज पुरवठा प्रभावित झाला आणि नागरिकांना त्रास झाला तर यासाठी महावितरण आणि एसएनडीएल जबाबदार राहतील. एसएनडीएलवर त्यांची असलेली थकीत रक्कम ५० कोटी रुपयावर पोहोचली आहे. त्यांच्या थकीत रकमेची गॅरंटी घेतली जावी, अशी त्यांची मागणी आहे. यादरम्यान मिलिंद बोरेकर, प्रकाश गजभिये, कुमार वैभव, गजानन नासरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण