शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

‘लाडकी बहीण योजने’साठी आतापर्यंत ६.५७ लाख अर्ज

By आनंद डेकाटे | Published: July 19, 2024 4:43 PM

नागपूर विभागात उत्तर प्रतिसाद, १४,६३७ मदतकेंद्र : माहितीसाठी १८१ हेल्पलाईन

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेला नागपूर विभागात चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत ६ लक्ष ५७ हजार ९९४ महिलांनी अर्ज सादर केले आहेत. आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यातील आहेत. या योजनेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवता यावा यासाठी १४,६३७ मदतकेंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.

महिला व बाल विकास विभागातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’मध्ये २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांना दरमहा १,५०० रुपये इतकी रक्कम आधारलिंक असलेल्या बॅक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी ‘ नारीशक्ती दूत’ ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रशासनातर्फे महिलांना सुलभपणे योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करता यावे यासाठी मदतकेंद्र सुरु केले आहेत. या मदत केंद्रावर पुरेशे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहेत.

विभागात आजपर्यंत २ लाख ५२ हजार ५७ अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून ४ लाख ५ हजार ९३७ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहेत.या योजनेच्या अधिक माहितीसाठी १८१ हा महिला हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक सुरु करण्यात आला आहे. यावर योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

जिल्हानिहाय अर्ज व मदत केंद्रजिल्हा             अर्ज सादर                मदत केंद्रनागपूर              २,७६,९१६                  ३,४०४गडचिरोली         १,४६,५२६                 २,३८६वर्धा                    ४५,५७७                   १,६२७भंडारा                ६३, ३५६                   १,४१७गोंदिया               ८५, २१५                   १,९०२चंद्रपूर                ४०,४०४                   २, ३८६

 

टॅग्स :nagpurनागपूरGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना