नागपूर - राज्य सरकारचं नागपूर येथील हिवाळी अधिवेशन हे नागरिकांच्या समस्या किंवा प्रश्नांनी कमी तर आरोप-प्रत्यारोपांनी आणि आंदोलनांनी गाजत आहे. त्यामुळे, खरंच जनतेचे सेवक म्हणवणारे लोकप्रतिनिधी सभागृहात आणि अधिवेशानातू नेमकं काय साध्य करतात, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. सत्ताधारी पक्ष आदित्य ठाकरेंना लक्ष्य करुन आरोप करत आहे. तर, विरोधी पक्ष भ्रष्टाचाराचे मुद्दे घेऊन सत्ताधारी मंत्र्यांवर कुरघोडी करत आहेत. त्यातच, कर्नाटक सीमावादही चांगलाच पेटला आहे. यावरुन आता खासदार आणि भाजपच्या समर्थक नवनीत राणा यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना चॅलेंज दिलं आहे. तसेच, उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.
तीन वर्षानंतर नागपुरात पाहिलं अधिवेशन शिंदे आणि फडणवीस सरकार मुळे होत आहे. सकाळी उठून फुसके बॉम्ब फोडले जात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी लवंगी बॉम्ब फोडला तर सगळ्यांना भारी पडेल, अशा शब्दात नवनीत राणा यांनी विरोधी पक्ष आणि शिवसेना नेत्यांवर प्रहार केला. तसेच, उध्दव ठाकरे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांनी विदर्भातील १० मोठे काम सांगितले तर माझ्या खासदारकीचा पाच वर्षाचा पगार मी संजय राऊत यांना देईल, असे चॅलेंजही राणा यांनी दिले. राणा यांनी नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केलं.
जनतेला फटाक्यात रस नाही
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना सर्व काम तोंडपाठ आहेत. पण उध्दव ठाकरे यांना एकही प्रपोजल तोंडपाठ नाही. जनतेला काम हवे आहेत आरोप प्रत्यारोपसाठी अधिवेशन नाही, जनतेच्या पैशातून अधिवेशनात खर्च केला जातो. कोणता बॉम्ब कोण फोडेल यात जनतेला रस नाही. खूप सारे विषय आहेत, काम करताना चुका प्रत्येक व्यक्ती कडून होतात. जर ते पकडायला सुरुवात केली तर त्यांना हे भारी जाईल.
फडणवीसांच्या कामातून व्हिजन दिसतं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटाके फोडण्यात काही इंटरेस्ट नाही. त्यांना कामात इंटरेस्ट आहे. समृध्दी महामार्ग, मेडिकल काम यात व्हिजन दिसूत येतं, असेही राणा यांनी म्हटलं.